Viral Video : बहिण भावाचं प्रेम हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा दिसून येतो. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय जगू शकत नाही. ते पुन्हा एकत्र येतात, बोलतात, खेळतात आणि पुन्हा भांडतात पण त्यांच्या नात्यात कधीही अबोला नसतो. प्रेम व्यक्त करण्याची त्यांची पद्धत ही वेगळी असते. सध्या असाच एक चिमुकल्या बहिण भावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येईल. व्हिडीओत बहिण भावाचे प्रेम दिसून येईल. चिमुकली बहिण भावाला मॅगी भरवताना दिसत आहे पण ती ज्या पद्धतीने मॅगी भरवते ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बहिण मॅगी खात असते आणि तिच्या शेजारी असलेला मोठा भाऊ मान खाली घालून मोबाइलमध्ये बघत असतो. तितक्यात व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकली मोठ्या भावाचे केस ओढते आणि मॅगीने भरलेला चमचा त्याच्या तोंडापुढे नेते. बहिणीला केस ओढून मॅगी खाऊ घालताना पाहून भाऊ सुद्धा अवाक् होतो आणि त्याला हसू आवरत नाही पण त्याचबरोबर असं कोण खाऊ घालतं, असा हावभाव तो दाखवताना दिसून येतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बहिण भावाचे हे अनोखे प्रेम पाहून कोणीही थक्क होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
brother_vs_sister__43 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहिण भावाला मेन्शन करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला माझी बहिण अशीच खाऊ घालते” तर एका युजरने लिहिलेय, “बहिण भावाचे प्रेम असेच असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी बहिण तर माझ्याकडून हिसकावून खाते” एक युजर लिहितो, “व्हिडीओ पाहून सासरी गेलेल्या बहिणीची आठवण आली”
यापूर्वीही सोशल मीडियावर बहिण भावाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावनिक असतात. नेटकरी बहिण भावाच्या व्हिडीओवर लाइक्सचा वर्षाव करतात.