एखादी नोकरी करत असताना आपल्याला तिथे ८ ते ९ तास काम करावं लागतं. अनेकदा आपल्यासोबत असं झालं असेल की आपल्याला काम करता करता खूप झोप येत आहे, मात्र बॉसच्या भीतीने आपण झोपू शकत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की झोपण्यासाठीही कुणाला पैसे मिळू शकतात? तुम्हाला हे खोटं वाटत असलं तरीही हे खरं आहे. एका व्यक्तीने असंच काहीसं करून दाखवलं आहे.

सुपर मेनस्ट्रीम नावाचा एक युट्युबर आपल्या बिछान्याजवळ मायक्रोफोन, कॅमेरा, लायटिंग आणि मॉनिटर चालू करून ठेवतो. त्याला बघण्यासाठी लाखो दर्शक या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये सहभागी होतात. त्याला बघणारे फक्त व्हिडीओच पाहत नाहीत, तर पैसे देखील डोनेट करतात. लाइव्ह स्ट्रीम संपल्यावर हा व्हिडीओ पोस्ट केला जातो.

Ukraine-Russia युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; रशियाच्या ‘या’ अ‍ॅपवर घातली बंदी

झोपेच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. सुपर मेनस्ट्रीम चॅनेलवरील हा व्यक्ती अनेक तासांपर्यंत झोपून असतो आणि हे स्ट्रीम बघणारे दर्शक त्याला गाणी वाजवून, मेसेज पाठवून आणि इतर आवाज करून उठवण्याचा प्रयत्न करतात. २१ वर्षाच्या या युट्युबरने सांगितले की आठवड्यातून एकदा सहा तासाचा युट्युब लाइव्ह करून २ लाखांहून अधिक रुपये कमावतो.

Ukraine War: देशासाठी कायपण! युक्रेनची बिअ फॅक्टरी दारू ऐवजी तयार करतेय दारुगोळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युट्युबवर स्लीप स्ट्रीम बराच लोकप्रिय आहे आणि अजूनही लोक याच्या माध्यमातून हजारो-लाखो रुपये कमवत आहेत. झोपूनच पैसे कमावण्याचा हा पर्याय लोकांना आवडत आहे. कंटेन्ट प्रोड्युसरद्वारे अपलोड केले गेलेले झोपेचे व्हिडीओ मॉनिटाइझ केले जातात. युट्युबवर स्लीप स्ट्रीममध्ये रुची असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. जानेवारीच्या पहिल्या ३ आठवड्यांमध्ये १७०हून अधिक व्हिडीओ युट्युबवर सापडले, तर मागील वर्षी स्लीप स्ट्रीमचे एकूण ५०० व्हिडीओच होते. यावरून असे लक्षात येत आहे की हा ट्रेंड आता अधिकाधिक लोकप्रिय ठरत आहे.