Snake Attack Little Goat Viral Video : प्राण्यांविषयी अनेकांना फार कुतूहल असतं. ते कसे जगतात, कसा संघर्ष करतात हे जाणून घ्यायला अनेकांना फार आवडतं. त्यामुळे सोशल मीडियावरही प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंत प्राण्यांच्या रोजच्या जगण्यातील संघर्ष पाहायला मिळतो. हा संघर्ष पाळीव प्राण्यांनाही चुकलेला नाही. सध्या सोशल मीडियावर एका म्हशीच्या रेडकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात रेडकाच्या जगण्या-मरण्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

पावसाळ्यात तुम्ही पाहिलं असेल की, गुरांच्या गोठ्यात विषारी सापांचा वावर दिसून येतो. कारण- गोठ्यात या दिवसांत बेडूक, उंदीर आणि इतर लहान लहान प्राणी शिरतात, जे सापांचे खाद्य आहे. पण, या खाद्याच्या शोधात साप अनेकदा गुरांवर हल्ला करतात. या व्हिडीओतही एक साप गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या रेडकावर जीवघेणा हल्ला करताना दिसतोय. पण या हल्ल्यातून रेकडू कशीबशी स्वत:ची सुटका करून घेते.

म्हशीच्या रेडकाच्या शरीराभोवती विषारी सापाने घातला विळखा

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका गोठ्यात बांधलेल्या म्हशीच्या रेकडाला विषारी सापाने विळखा घातला आहे. त्याने त्या रेडकाला अगदी मानेपासून ते पोटापर्यंत विळख्यात जखडलं आहे. त्यामुळे सुटका करून घेणं त्याला जवळपास अशक्य वाटतंय. रेडकासाठी हा एक जगण्या-मरण्याचा क्षण होता. त्यामुळे सापाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी रेकडू सतत उड्या मारून कधी शेपटीनं, तर कधी पायानं त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतंय. अखेर रेडकाच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि साप विळखा सोडून रेडकापासून दूर होतो. सुदैवानं यात रेडकाला कोणतीही दुखापत होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हशीच्या रेडकाचा आणि सापाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @vivek_choudhary_snake_saver नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना धक्काच बसला आहे. त्यामुळे युजर्सही व्हिडीओ कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, व्हिडीओ काढण्यापेक्षा रेडकाची मदत केली असती, तर बरं झालं असतं. दुसऱ्या युजरनं लिहिलं की, नशीब सापानं रेडकाला काही केलं नाही. तिसऱ्यानं लिहिलं की, खरंच हा फार भयानक व्हिडीओ आहे.