टॉयलेट मध्ये चुकून साप बाहेर आला तर.. बहुदा प्रत्येकानेच हे वाईट स्वप्न पाहिलं असावं. पण हा धक्कादायक प्रकार अलीकडेच एका व्यक्ती सोबत प्रत्यक्ष घडला आणि त्याचा परिणाम इतका भीषण होता की यामुळे चक्क या व्यक्तीला आपल्या गुप्तांगाची शस्त्रक्रिया करावी लागली. दक्षिण आफ्रिकेतील एका सफारी दरम्यान एका डच पर्यटकाला हा दुर्दैवी अनुभव आला आहे. सफारी दरम्यान टॉयलेट मध्ये गेले असताना एका किंग कोबरा सापाने या इसमाच्या गुप्तांगाचा चावा घेतला. यानंतर या इसमाच्या गुप्तांगाला बुरशी येऊ लागली. इतकेच नव्हे तर त्याच्या अंडकोषाच्या पिशवीला सुद्धा असहनीय वेदना होत होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार, हा इसम टॉयलेट मध्ये गेला असताना तो साप टॉयलेटमधून बाहेर आला आणि त्याने गुप्तांगाचा चावा घेतला. यानंतर गुप्तांगाची प्रचंड जळजळ होऊ लागली. हळूहळू या वेदना कंबरेपासून ते पार छातीपर्यंत पोहचल्या तसेच त्याला मळमळ होऊ लागली. दुर्दैव इतके की यानंतर या व्यक्तीला ३५० किमी दूर असणाऱ्या ट्रॉमा सेंटरला घेऊन जाण्यासाठी सुद्धा ३ तास वाट पाहावी लागली.

महिलेने Condom ला सुईने पाडलं छिद्र, पार्टनरने गाठली थेट कोर्टाची पायरी..काय घडलं पहा

दरम्यान, हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यावर डॉक्टरांच्या लक्षात आले की या व्यक्तीच्या लिंग व अंडकोषाला सूज आली होती. तसेच गुप्तांगाचा रंगही निळा जाहला होता. यावेळी हेमोडायलिसिस शस्त्रक्रियेचा आधार घेऊन या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात आले. या घटनेनंतर डॉक्टरांनी सुद्धा सर्वांना टॉयलेटचा वापर करण्याआधी फ्लश करण्याचा सल्ला दिला आहे.

तरुणाने गिळली चक्क 63 नाणी, 2 दिवस पार पडली शस्त्रक्रिया, कारण ऐकाल तर व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी देखील ऑस्ट्रिया मध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टवर अजगराने हल्ला केला होता. धक्कादायक बाब अशी की हा अजगर या इसमाच्या शेजाऱ्याचा पाळीव होता. या घटनेत इसमाला फार इजा झाली नव्हती मात्र आफ्रिकेतील नुकत्याच घडलेल्या प्रसंगात हा सापाचा हल्ला इसमाच्या जवळपास जीवावर बेतला होता.