Giant Python Attack: अजगर म्हटला की अंगावर शहारा येतो… पण जर तो थेट चेहऱ्यावर चावला आणि तब्बल ४० सेकंद जर काही भयंकर घडलं तर काय होईल? हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल झाला. काय घडलं होतं त्या क्षणी? अजगर इतका संतापलेला का होता? आणि शेवटी त्या माणसाचं काय झालं? हे सर्व जाणून घ्या खालील धक्कादायक बातमीत… पण, सावधान! हे दृश्य कमकुवत हृदयाच्या व्यक्तींनी एकट्याने पाहू नये.

साप म्हटलं की अनेकांना अंगावर काटा येतो. साप पकडण्याचं धाडस नेहमीच जोखमीचं असतं. पण, जे काही या व्यक्तीसोबत घडलं, ते पाहून अंगावर काटा येईल. एक प्रचंड अजगर एका व्यक्तीवर एवढ्या भयानक पद्धतीनं तुटून पडला की त्याने थेट गालावर चावलं आणि तब्बल ४० सेकंद तसाच चिकटून राहिला. या थरकापजनक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं की, सर्प पकडणारी व्यक्ती हातात दस्ताने घालून जाळ्यात अडकलेल्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करत असते. एका व्यक्तीने अजगराची शेपटी पकडलेली असते. पण, अजगराचं लक्ष वेगळंच असतं. जसा सर्प पकडणारा त्याच्या मानेकडे हात नेतो, तसाच संतापलेला अजगर वाघासारखी उडी मारून थेट त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चावतो. क्षणभरासाठी सगळे जण दचकतात. इतकं सगळं अचानक घडतं की आजूबाजूचे लोक सुन्न होतात. कोणीही तत्काळ मदतीला पुढे येत नाही.

या झटापटीत अजगराने त्या व्यक्तीच्या गालावर घट्ट चावलेलं असतं आणि जवळपास ४० सेकंद तो तसाच चिकटून राहतो. शेवटी कसंबसं त्याला वेगळं केलं जातं. या घटनेचं स्थान आणि तारीख स्पष्ट झालेली नाही, पण याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

हा व्हिडीओ ‘The Real Tarzan’ नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन इंटरनेट सेलेब्रिटी माइक होल्स्टन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेटिझन्सच्या आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतं, “भाऊ अजून शिकतोय वाटतं!”, तर एकाने थट्टेच्या सुरात म्हटलं, “अजगराने लव्ह बाईट दिला वाटतं!”

अजगराचं चावणं किती धोकादायक?

अजगर विषारी नसले तरी त्यांच्या धारदार दातांमुळे चावतानाच प्रचंड वेदना होतात. खोल जखमा, सूज आणि त्रास होण्याची शक्यता असते.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/p/DMmFxKXTaZB/utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=b5684e54-baa3-400b-8981-36475d016262

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रकरण म्हणजे सर्पमित्रांसाठी एक इशारा आहे. प्रशिक्षणाशिवाय सापांच्या नादी लागू नका!