Snake Roamance In A Cafe Viral Video : अनेकदा आपण कॅफेमध्ये गेलो की आजुबाजूला रोमॅंटिक गाणे, टेबलवर गरम गरम कॉफीचा आस्वाद घेत एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले कपल आणि त्यांच्यामधला रोमान्स…असंच काहीसं चित्र तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण कॅफेमध्ये फक्त कपलंच रोमान्स करतात असं नव्हे. होय. माणसांप्रमाणेच सापही कॅफेमध्ये रोमान्स करतात. हे वाचून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल. असं कोणतं कॅफे आहे, जिथे साप येऊन रोमान्स करतात? तर हे खरंय. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

अनेकदा साप पाहिले की अंगावर काटा उभा राहतो. तो आपल्या चावेल या भीतीने आपण त्याच्यापासून दूर जातो. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यात सापांना पाहून तुम्हाला भीती वाटणार नाही, तर “किती क्यूट” असेच उद्गार तुमच्या तोंडी येतील. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही दोन सापांना कॅफेमध्ये रोमान्स करताना पाहू शकता. हे सर्प मिलन कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. या दोन सापांचा रोमॅंटिक मूड नक्कीच पाहण्यासारखा आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ते दोघं रोमान्स करताना बॉलिवूड कपल्सप्रमाणे एकमेकांमध्ये आकुंठ बुडालेले दिसत आहेत. एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात.

आणखी वाचा : मोठ्या भावाची ही ‘कॅच’ छोट्याला जीवनदान देणारी ठरली! हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

कॅफेमध्ये रोमान्स करणाऱ्या या दोन सापाचं एक अनोख प्रेम पाहायला मिळालं. हा व्हायरल व्हिडीओ ऑस्ट्रेलियामधला असल्याचं सांगण्यात येतंय. कॅफेमध्ये उपस्थित लोक हे सर्प मिलन त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्यांचा व्हिडीओ बनवू लागतात. साप पाहून घाबरणं तर दूर आणखी उत्साही होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आणखी वाचा : खासदाराचा न्यूड VIDEO VIRAL, नेता म्हणाले, “हा मॉर्फ केलेला व्हिडीओ, लॅबमध्ये तपासा”

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चिप्सच्या पाकिटांपासून पिशव्या आणि बरंच काही! पुणेकर महिलांच्या या सुंदर उपक्रमाचा VIDEO VIRAL

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @InterestingAsF नावाच्या ट्विटरवर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला १५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. कमेंट्स सेक्शनमध्ये लोक यावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.