Child Playing Dangerous Snake Video Viral : सापाची अनेकजण मनोभावे पुजा करतात. मात्र तो दिसला तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. सापाच्या एका दंशाने माणसाचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे विषारी साप नसला तरी तो पाहिल्यानंतरही मनात भीती निर्माण होते. अतिशय भयानक प्राण्यांमध्ये सापाचे नाव घेतले जाते कारण तो कधी कोणावर हल्ला करेल याचा काही नेम नाही. सापाचे धक्कादायक व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. अशात आणखी एक नवा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही एका चिमुकल्याच्या धाडसाचे कौतुक कराल. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

एक चिमुकला सापाला फरपटत घरात घेऊन येतो. अगदी हातात दोरी पडल्याप्रमाणे त्याने सापाला धरले होते. यावेळी घरात काही महिला पूजापाठ ंकरत होत्या, पण त्या महिलांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला आणि त्या भीतीने पटकन जागेवरून उठून उभ्या राहिल्या. पण त्या चिमुकल्याला कसलीही भीती वाटत नव्हती. चिमुकल्याच्या थक्क करणाऱ्या या कारनाम्यामुळे बाकीच्यांना मात्र धडकीच भरली.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला सापाच्या शेपटीला पडकून त्याला फरपटत घेऊन येत आहे, चिमुकला त्या सापाला दोरीसारखा पडकून आणत होता, यावेळी तो सापही इकडून तिकडे अगदी आरामात हलताना दिसला. चिमुकला सापाला घरात घेऊन जाताच तिथे काही महिला देवाची पूजा करत होत्या, त्यांनाही सापाला पाहून धडकीच भरली, त्या खूप घाबरल्या, जीव वाचवण्यासाठी इकडून तिकडे पळण्याचा प्रयत्न करु लागल्या. मात्र चिमुकला दाराच सापाला घेऊन थांबल्याने त्यांनाही सुचेना कुठे जायचं म्हणून त्या चिमुकल्यावर जोरात ओरडू लागल्या. यादरम्यान चिमुकल्याचा पाय चुकून सापाच्या तोंडावर पडला. यात त्याला सापाने दंश केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पण लगेच तो बाजूला झाल्याने अनर्थ टळला. यानंतर एक व्यक्ती येऊन मुलाला सापासोबत घेऊन जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @f_l_addiction.officia नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जो काही वेळातच खूप व्हायरल होत आहे. अनेक लोक व्हिडीओवर कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत. बहुतेकांनी याला निष्काळजीपणा म्हणत चिमुकल्याचा आई-वडिलांना फटकारले आहे. तसेच हा चेष्टेचा विषय नसून चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओवर लोक अधिक आक्रमक कमेंट करताना दिसतंय