Snake Viral Video : सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून एकतर आपण आश्चर्यचकित होतो किंवा पाहिल्यानंतर आपल्याला प्रचंड भीती तरी वाटते. साप हा सरपटणारा प्राणी मनुष्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. कारण या सापाच्या अशा काही प्रजाती आहे ज्यांच्या दंशाने काही क्षणातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओ पाहून युजर्स शॉक

तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओंमध्ये पाहिलं असेल की, अनेक प्राणी प्रेम सापाबरोबर खेळताना दिसतात. कधी मानेवर सापाला घेऊन फिरतात तर कधी सापाला अगदी तोंडासमोर घेऊन जात जीवघेणे प्रकार करत असतात. अशाचप्रकारे एक तरुण एका दुर्मिळ सापाला हाताने पकडून माहिती सांगत होता. पण सापाने अचानक त्याच्या हातावर दंश केला. पण यानंतर तरुणाने सापाचा असा काही बदला घेतला की, पाहून तुम्हाला भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकजण शॉक झालेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण जंगलात भटकंती करत असतो. यावेळी तो पिवळ्या आणि काळ्या पट्ट्या असलेल्या एका दुर्मिळ सापाला पकडतो आणि कॅमेऱ्यात पाहून त्याविषयी माहिती देत असतो. पण सापाला पकडताच तो तरुणाच्या हातावर झेप घेत दंश करतो. हे पाहून तरुण काही वेळ थांबतो आणि लगेच सापाचा बदला घेतो. तरुण सापाला तसाच हात पकडून ठेवतो आणि चक्क त्याला जोरात चावतो. ज्यामुळे तरुणाच्या हातात दंश करण्यासाठी घुसवलेले दात साप लगेच बाहेर काढतो आणि वेदनेमुळे झबडा मोठा करतो. अशाप्रकारे तरुण सापापासून आपली सुटका करुन घेतो.

व्हिडीओतील तरुणाने सापाबरोबर केलेले हे कृत्य पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. कारण आत्तापर्यंत सापाने माणसाला दंश केलेलं आपण अनेकदा पाहिलं पण माणसाने सापाला चावल्याची ही पहिलीच घटना असेल. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही पाहिलेला हा व्हि़डीओ @cutecomrade नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना ‘साप धोक्यात आहे’ असे कॅप्शन लिहिले आहे. दरम्यान अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “शेवटी कोणीतरी संपूर्ण मानवजातीच्या वतीने बदला घेतला आहे”. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, “परिपूर्ण बदल”. तिसऱ्या यूजरने लिहिलेय की, “आता तो कोणालाही चावणार नाही”. चौथ्या यूजरने लिहिलेय की, “साप म्हणत असेल की हे लोक खूप धोकादायक आहेत”. आणखी एका यूजरने लिहिलेय की, “सापाचा धोका नाही तर आता सापच धोक्यात आहेत”.