Kili Paul Viral Video: सोशल मीडिया स्टार किली पॉल हे सध्या इंटरनेटवरील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. पॉल अनेकदा बॉलिवूड गाण्यांचे लिप्सिंग करताना किंवा डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात. दरम्यान आता किली पॉलदेखील मराठी गाण्यांच्या प्रेमात पडला आहे. या रिल्समधील किलीच्या मराठमोळ्या अंदाजाचं अनेकजण कौतुक करत आहेत. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली कविता “काय सांगू राणी मला गाव सुटना” यावर किली पॉलने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहेत.

सुख, आत्मसमाधान, मन:शांती हे सारं काही बाजूला ठेवून आपण कोठे जातोय, याची माणसालाच खबर राहिलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शहर आणि गावाच्या संस्कृतीमधील मोठी दरी दाखवणारी ही कविता आहे. नोकरीनिमित्त शहरामध्ये स्थायिक झालेल्या गावाकडच्या तरुणांनी तर ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. कवी गणेश शिंदे यांनी गायलेल्या या कवितेचा व्हिडीओ पहिल्यांदा व्हायरल झाला होता त्यानंतर ही कविता प्रत्येकाच्याच जवळची झाली. २ लाखांहून अधिक चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला असून चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्सचाही वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, किलीने ‘मराठी’ असं कॅप्शन देत त्याने हा रिल शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तिनं धावत्या लोकलमध्ये प्रवाशाची कॉलर पकडली; भर गर्दीतला माय-लेकीचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सोशल मीडियावर किलीच्या बऱ्याच मराठी गाण्यांच्या व्हिडीओंची बरीच चर्चा होताना दिसते. “काय सांगू राणी मला गाव सुटना”, “मावळं आम्ही वादळ आम्ही” आणि “नांदण नांदण रमाचं नांदण” या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. किलीने आणि त्याची बहिण नीमाने ‘बहरला हा मधुमास नवा’, ‘एका वाघाची शिकार एका हरणीने केली’ या मराठी गाण्यांवरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यांना सोशल मीडियावर उत्तम प्रतिसादही मिळाला होता.