Son gifted Bullet to his father: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रति आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं. अशाच एका तरुणानं त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षांपासून असलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलानं वडिलांनं असं गिफ्ट दिलंय, की जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. वडिलांचे अश्रू तर थांबतच नाहीयेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या तरूणानं त्याच्या वडिलांना अगदी नवीकोरी बाईक देऊन आश्चर्यचकित केले. त्याच्या वडिलांचा ५३ वा वाढदिवस होता आणि त्यांना लेकाकडून बॉक्स मिळाला. त्यांनी तो बॉक्स उघडल्यानंतर ती त्याच्या नवीन दुचाकीची चावी सापडली. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की जवळजवळ त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर घराबाहेर पार्क केलेली दुचाकी पाहण्यासाठी ते घराबाहरे पडले. सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्यांना भरून आलं आणि अक्षरश:आनंदाश्रू वाहत असल्याचं दिसलं.

हा व्हिडीओ पाहून अनेक जण भाऊक झाले आहेत. कारण बुलेटची किंमत जवळपा दिड ते दोन लाख रुपये इतकी असते. अन् इतकं महागडं गिफ्ट वडिलांना दिल्याबद्दल अनेकांनी त्या मुलाचं कौतुक केलं आहे. कारण वडिलांच्या अश्रूंची किंमत नक्कीच त्या बुलेटपेक्षा जास्त आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाप असावा तर असा! कॅन्सर झालेल्या मुलाला चिडवलं म्हणून वडिलांनी आपल्याच मुलासोबत काय केलं पाहा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ officialpeopleofindia नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मीही एक दिवस माझ्या वडिलांना कार गिफ्ट करीन. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.