Viral video: वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात; पण आपल्या भावना ते कोणाशीही शेअर करीत नाहीत. मुलं वडिलांपेक्षा आईच्या अधिक जवळ असतात. वडिलांप्रती आदरयुक्त भीती पाहायला मिळते. मात्र, वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हे कित्येक मुलांचंही एक स्वप्न असतं. अशाच एका तरुणानं सीए झाल्यावर त्याच्या वडिलांचं कित्येक वर्षांपासून असलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलानं वडिलांनं असं गिफ्ट दिलंय, की जे पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. वडिलांचे अश्रू तर थांबतच नाहीयेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारच्या शोरुममध्ये मुलं आणि वडिल कार बघायला आले आहेत. मात्र वडिलांना हे माहिती नाहीये की, कार आधीच बुक केली असून कारची डिलिव्हरी घ्यायला ते आले आहेत. यावेळी कार बघत असताना मुलगा आपल्या वडिलांना अचानक कारची चावी देतो. थोडावेळ त्यांना काही कळत नाही की नक्की काय सुरु आहे. नंतर त्यांची मुलगी त्यांना चावी घ्यायला सांगते. तेव्हा त्यांच्या संपूर्ण प्रकार लक्षात येतो. लहानपणापासून वडिलांना गाडी घेऊन द्यायचं स्वप्न मुलानं सीए झाल्यावर पूर्ण केलं.

या व्हिडीओमध्ये वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाधान तुम्ही पाहू शकता. गाडी बघून तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सुरुवातीला त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. नंतर त्यांना भरून आलं आणि अक्षरश:आनंदाश्रू वाहत असल्याचं दिसलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जंगल सफारीदरम्यान अचानक वाघ आला जवळ, गाडी पुढे जाताच करू लागला पाठलाग, अन् मग…

हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. इतकं महागडं गिफ्ट वडिलांना दिल्याबद्दल अनेकांनी त्या मुलाचं कौतुक केलं आहे. कारण- वडिलांच्या अश्रूंची किंमत नक्कीच त्या कारपेक्षा जास्त आहे. मीही एक दिवस माझ्या वडिलांना कार गिफ्ट करीन. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.