Viral video: एकीकडे शेती शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शेतकऱ्याचं पोरगं मात्र मोठी मोठी स्वप्न पाहतं. स्पर्धा परिक्षा, कलेक्टर, ऑफिसर, सरकारी नोकरी. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलानं सरकारी नोकरीचं स्वप्न पाहिलं. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या मुलाचा रिझल्ट लागतो, आणि त्यावेळी बाप-लेकाची झालेली भेट पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुपारच्या भर उन्हात वडील शेतात काम करत आहेत. यावेळी अचानक शेतकऱ्याच्या मुलाला कळतं की त्याचा निकाल लागला आहे. यावेळा तो थेट शेतात जातो जिथे वडील काम करत असतात. यावेळी वडिलांना बातमी सांगून मुलाला आणि वडिलांना अश्रू अनावर होतात. मुलगा शेतातच वडिलांच्या पायावर नतमस्तक होतो. यावेळी दोघेही एकमेकांना मिठी मारुन रडू लागतात. वडिलांना होणारा आनंद हा शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मुलं अभ्यास करतात, स्वप्न पाहतात, आणि जेव्हा हे स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा आयुष्यभराचे कष्टाचं फळं मिळाल्याची भावना या व्हिडीओमध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ mpsc_policebharti_guru या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “जिथे संघर्ष तिथे विजय निश्चित” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. नेटकऱ्यांच्याही हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस उतरला असून नेटकरी भावूक झाले आहेत. नेटकरी व्हिडीओवर भावनिक प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, बापाच्या कष्टाचं चीज झालं. तर दुसऱ्या एकाने शेवटी संघर्षाचं फळ मिळालं अशी कमेंट केलीय.