बुधवारी २६ जानेवारीला आपल्या देशात ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने देशभरात देशभक्तीशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यामध्ये भारतीय सैन्याचा जवानांचे अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयटीबीपीच्या जवानाने गायले देशभक्तीपर गीत

अशातच एक व्हिडीओ लोकांचं मन जिंकतोय. हा व्हिडीओ एका सैनिकाचा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सैन्याचा एक जवान देशभक्तीपर गाणे गाताना दिसत आहे. लष्कराच्या या जवानाने गायलेले गीत ऐकून तुमचेही डोळे पाणावतील.

व्हिडीओमध्ये हा जवान मोहम्मद रफ़ी यांनी गायलेले ‘कर चले हम फिदा’ हे लोकप्रिय गीत गात आहे. या जवानांचे नाव आयटीबीपी कॉन्स्टेबल विक्रमजीत सिंग असे आहे. आयटीबीपीने हा व्हिडीओ शेअर करत, ‘कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.. कॉन्स्टेबल विक्रम जीत सिंग प्रजासत्ताक दिनानिमित्त गीत गात आहेत.’ असे लिहले आहे.

“आता फक्त बर्फ पडायचा बाकी” कडाक्याच्या थंडीमुळे मुंबईकरांचे झाले हाल; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल

या व्हिडीओमध्ये २ जवान दिसत आहेत. गीत गाणारे विक्रम जीत सिंग असून दुसरा जवान गिटार वाजवत आहे. विक्रम जीत जे गाणं गात आहेत ते १९६४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हकीकत’ चित्रपटातील आहे. हे गाणे कैफ़ी आजमी यांनी लिहले असून मोहम्मद रफ़ी यांनी हे गाणे गायले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Song sung by soldiers occasion of republic day you will feel proud watching video pvp
First published on: 27-01-2022 at 12:17 IST