Mumbai Airport Garba Video :नवरात्राचा उत्सव म्हणजे केवळ धार्मिक समारंभ नाही, तर रंगीबेरंगी पोशाख, ढोल-ताशांच्या तालावर केलेले गरबा व डांडियाचे नृत्य, आणि सामूहिक आनंद याचा साजरा करण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे. प्रत्येक शहरात आणि गावात लोक उत्साहाने गरबा रचतात, नव्या वर्षाची शुभेच्छा देतात आणि आपल्या संस्कृतीला जीवंत ठेवतात. या उत्सवात प्रत्येक वयोगटातील लोक सहभागी होतात, पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि संगीताच्या तालावर एकत्रितपणे नृत्य करतात, ज्यामुळे नवरात्राची रंगत आणि आनंद दुहेरी होतो.

संपूर्ण भारतात नवरात्रोत्सवादरम्यान अनेक लोक उत्साहाने दांडिया आणि गरबा खेळताना दिसत आहे. पण भारतीयांनी आता हद्दच पार केली आहे. मैदानावर नव्हे तर थेट विमानतळवर जाऊन गरबा दांडीया खेळताना लोक दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान हर्ष गोयनका यांना हा व्हिडिओ शेअर करत या कृतीचे समर्थन केले ज्यामुळे अनेकांचा रोष आणखी वाढला. काहींना मानक व शिस्तीच्या दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही, ज्यामुळे वादाचा विषय झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबई विमानतळावर काही पुरुष आणि महिला पारंपरिक पोशाखात गरबा करताना दिसत आहेत, तर विमानतळ कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्ममध्ये ढोलकी वाजवत आहेत, दांडीया खेळत आहे. दरम्यान, व्हिडिओ शेअर करताना “प्रवासी, पायलट, कर्मचारी, लोडर्स – सगळे एकाच तालावर नाचत आहेत. जगात कुठलाही इतर विमानतळ असा उत्साह दाखवत नाही. हे आहे भारत,” असे कॅप्शन हर्ष गोयांका यांनी दिले आहे ज्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

विमानतळ सारख्या सार्वजनिक ठिकाणी गरबा-डांडिया खेळणे अत्यंत चुकीचे आहे. विमानतळ हा प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि कामकाजाची जागा आहे, जिथे शिस्त आणि नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते. अचानक नृत्य किंवा उत्सवाच्या कार्यक्रमामुळे गर्दी निर्माण होऊ शकते, प्रवाशांना गैरसोय होऊ शकते, आणि आपत्कालीन परिस्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो. शिवाय, असे कार्यक्रम योग्य वेळ आणि जागेची न पाहता केले जातील, तर ते सार्वजनिक शिस्त आणि नागरिकांचा अधिकार दोन्ही भंग करू शकतात. त्यामुळे विमानतळसारख्या सार्वजनिक आणि कामकाजाच्या जागी उत्सव साजरा करण्याऐवजी नियोजित आणि सुरक्षित ठिकाणीच गरबा-डांडिया करणे अधिक शहाणपणाचे ठरते.

दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडिओवर टीका केली, काहींनी हा प्रकार प्रवासी व नागरिकांसाठी गैरसोय निर्माण करणारा असल्याचे म्हटले. “अशा वागणुकीमुळे भारतीय परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी समस्या निर्माण होते, कृपया असे नकोसे प्रचार करू नका. एकदा तुम्ही असे केले आणि अशा वर्तणूकीचे समर्थन केले तर लोक कुठेही, योग्य वेळ व जागा न पाहता ते करायला सुरुवात करतात,” एका वापरकर्त्याने लिहिले. “किती लाजीरवाणे आहे,” दुसऱ्या एका वापरकर्त्याचे मत आहे.

“हॅप्पीनेस इंडेक्समध्ये आपण कुठे आहोत? नृत्य हा आनंदाचे निकष असल्यास, आपण नंबर १ असायला हवा,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली. “माझ्या मते हा उत्सव साजरा करण्याचा योग्य मार्ग नाही. आपल्या कामाच्या जागेची पवित्रता राखणे महत्त्वाचे आहे. कल्पना करा, अशा फ्लॅश डान्सेस हॉस्पिटल्स, कोर्ट्समध्ये सुरु झाल्यास काय होईल,” चौथ्या वापरकर्त्याने म्हटले.

मागील आठवड्यात, मुंबई स्थानिक ट्रेनमध्ये प्रवाशांनी गरबा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता, ज्यावरही मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया नोंदल्या गेल्या होत्या. त्या व्हिडिओमध्ये काही पुरुष पारंपरिक तालावर टाळ्या वाजवत व फिरत दिसत होते.