सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधीकधी हे व्हिडीओ मजेशीर असतात, तर कधीकधी अतिशय भयानक असतात. आतापर्यंत तुम्ही या व्हायरल व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांमधली झुंज पाहिली असेल, त्यांच्यातील मस्ती पाहिली असेल. अनेकदा हे प्राणी कुठेतरी अडकतात आणि माणूस त्यातून त्यांची सुटका करतो, आणि त्यांचे प्राण वाचवतो, असे खूप व्हिडीओ आपण आजवर पाहिले असतील. पण आजचा व्हिडीओ जरा वेगळा आहे.
हत्ती आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक किस्से आजवर आपण ऐकत आलो आहोत. हत्ती हा अतिशय शांत आणि मैत्रीपूर्ण प्राणी मानला जातो. तो इतका मोठा आणि वजनदार आहे की त्याला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी असा टॅग मिळाला आहे. हत्तीचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमधील हत्तीच्या पिल्लाने केलेली कृती पाहून तुम्हालाही त्याचे कौतुक वाटेल.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की हत्तीचा एक गट नदीच्या शेजारून जात आहे. त्याचवेळी एक माणूस नदीच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे. हत्तीच्या गटातील एका लहानश्या पिल्लाला हा वाहत जाणारा माणूस दिसतो. तेव्हा कसलाही विचार न करता हे पिल्लू लगेचच नदीत उतरते आणि त्या माणसाला वाचवण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने पुढे जाऊ लागते. काही वेळातच हे पिल्लू त्या माणसाजवळ पोहोचते आणि आपल्या सोंडेच्या मदतीने त्याला किनाऱ्याजवळ ढकलते.
ऐकावं ते नवलंच! ‘या’ महापौराने चक्क मगरीशी बांधली लग्नगाठ; जाणून घ्या, काय आहे प्रकरण
@MorissaSchwartz या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ५.६ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ११ लाख २७ हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ पाहून खूपच खुश झाले आहेत. या पिल्लावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रत्येकजण या पिल्लाच्या कृतीचं कौतुक करताना दिसत आहे.