Jaipur Students Arrive Helicopter In Farewell : शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सुंदर काळ असतो. शाळेतील अभ्यासाची ती १० वर्षे किती पटापट निघून जातात लक्षातच येत नाही. अखेर १० वी पूर्ण झाल्यानंतर शाळेला निरोप देण्याची वेळ येते. यासाठी शाळांमध्ये फेयरवेल पार्टीचे आयोजन केले जाते. यानिमित्त विद्यार्थी एकमेकांना शाळेत शेवटचं एकत्र भेटतात आणि आनंदाने शाळेतील आठवणींना उजाळा देत निरोप घेतात. यावेळी काही विद्यार्थी शाळेतील ही एकत्र शेवटची भेट आणि फेयरवेल पार्टी खूप खास बनवण्याचा प्रयत्न करतात. पण, एका विद्यार्थ्याने ही फेयरवेल पार्टी इतकी खास केली की, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. या विद्यार्थ्याने फेयरवेल पार्टीनिमित्त शाळेत चक्क हेलिकॉप्टरने एन्ट्री घेतली. त्याची ही एन्ट्री पाहून इतर विद्यार्थी अवाक् झाले. राजस्थानमधील एका कॉन्व्हेंट शाळेत हे घडले आहे.

शाळेच्या फेयरवेल पार्टीत चक्क हेलिकॉप्टरने एन्ट्री

राजस्थानच्या जयपूरमधील सेंट मेरी कॉन्व्हेंट सीनियर सेकंडरी शाळेत १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फेयरवेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. यासाठी सर्व विद्यार्थी छान नटून थटून एक एक करून शाळेत पोहोचत होते. मात्र, एका विद्यार्थ्याच्या एन्ट्रीने सर्वांनाच थक्क करून सोडले. विद्यार्थ्याने कोणत्याही महागड्या कार, बाईक नाही तर थेट हेलिकॉप्टरने शाळा गाठली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला विद्यार्थी हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचे दिसतो, यावेळी त्याचे हेलिकॉप्टर शाळेच्या मैदानात उतरते, जे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. व्हिडीओतील हे दृश्य एकदा पाहिल्यानंतर तुम्हालाही ते पुन्हा पुन्हा पाहावंस वाटेल, कारण या विद्यार्थ्याने एन्ट्रीचं इतकी जबरदस्त घेतली होती. याचवेळी इतर अनेक विद्यार्थी अलिशान वाहनांतून येत होते. यामुळे रस्त्यांवर आलिशान गाड्यांची रांग लागली होती, जणू काही सेलिब्रिटी येत असल्याचा माहोल होता. येथील प्रत्येक विद्यार्थ्याच्या एन्ट्रीने उपस्थित लोक शॉक झाले.

View this post on Instagram

A post shared by VIDEO NATION (@videonation.teb)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हेलिकॉप्टरमधून शाळेतील फेयरवेल पार्टीत पोहोचलेल्या विद्यार्थ्याचा हा व्हिडीओ आता वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट्स करत आहे. @videonation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.