Ola Driver Scam: खासगी कॅबमधून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांबरोबर फसवणुकीच्या घटना घडतात. बुकिंगवेळी २०० असणारे भाडे प्रवास पूर्ण झाल्यानंतर अधिक वाढवून सांगितले जाते. अशावेळी प्रवाशांना ड्रायव्हरला जास्तीचे पैसे द्यावे लागतात. असाच काहीसा प्रकार बेंगळुरूमधील एका विद्यार्थ्याबरोबर घडला आहे. त्याने ७३० रुपयांना कॅब बुक केली होती, पण उतरण्याच्या वेळी त्याच्याकडून ७०० पट जास्तीच्या भाड्याची मागणी करण्यात आली.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, अनुराग कुमार सिंग या बेंगळुरूमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने ओला राईड बुक केली होती. पण, या कॅबचालकाने त्याच्याकडून अपेक्षेपेक्षा जवळपास सहा पट अधिकचे भाडे आकारले.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी

राईड बुक करताना कंपनीच्या अॅपमध्ये त्याला राइडचे भाडे ७३० रुपये दाखवले जात होते, पण गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर त्याच्याकडून ५१९४ रुपयांची मागणी करण्यात आली.

मुलीने खोटं बोलून ऑफिसला घेतली सुट्टी, विमानात बसताच दिसला बॉस अन्…; पाहा VIDEO

अनुराग कोलकाताहून केम्पेगौडा विमानतळावर उतरला आणि त्याने ओला मिनी टॅक्सी बुक केली. सुरुवातीला त्याला खूप स्वस्तात टॅक्सी मिळाली असे वाटले, पण गंतव्यस्थानी पोहोचताच अॅपने भाडे ५००० रुपये दाखवले, त्यामुळे अनुरागला धक्काच बसला., त्याने सांगितले की, त्याने संपूर्ण बंगळुरु शहराला भेट दिली असती तरी त्याला इतके पैसे मोजावे लागले नसते.

घटनेनंतर अनुराग काय म्हणाला?

अनुराग कुमार सिंह म्हणाला की, OTP टाइप केल्यानंतर कॅब ड्रायव्हरला अॅपवर माझे नाव सापडले. आम्ही इच्छितस्थळी पोहोचल्यावर त्याने मला त्याचा फोन स्क्रीन दाखवला, ज्यावर ५१९४ ही रक्कम दाखवण्यात आली होती.

अनुरागने सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या फोनवर भाडे तपासले तेव्हा त्याला कळले की, अॅपवरून राइड कॅन्सल करण्यात आली होती. अनुरागने या घटनेची तक्रार कॅब एग्रीगेटरच्या ग्राहक मंचावर केली.

ओलाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही

बेंगळुरूमधील या घटनेनंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. अद्याप याबाबत ओलाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आतापर्यंत कंपनीने या प्रकरणी मौन बाळगणेच योग्य मानले आहे.