तसा २१ जून हा दिवस आपल्यासाठी रोजच्या दिवसासारखा. या दिवसात काय स्पेशल असणार म्हणा. फार फार तर आपल्या ओळखीच्या व्यक्तींचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, योग दिवस वगैरे असेल. पण या गोष्टी तूर्तास तरी बाजूला ठेवा कारण २१ जून या तारखेचं महत्त्व त्याहूनही वेगळं आहे. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्याचे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते. त्यामुळे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग बदलतो आणि त्यामुळेच हळूहळू दिवस लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते.
Viral Video : हार्दिक पांड्याचा याच्यापेक्षा दुसरा ‘जबरा फॅन’ असूच शकत नाही!
भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत. २१ डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते. २१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी आहेत. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते . काही देशांत २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. आपल्या इथे जरी तीन ऋतू असले तरी अनेक देशांत हिवाळा आणि उन्हाळा हे दोनच ऋतू असतात. तेव्हा नाच गाणी, मेजवाजी अशा उत्साहात २१ जून दिवस साजरा केला जातो.
Viral Video : लिपस्टिक आणि आयशॅडो लावलेल्या शोएब अख्तरला पाहून हसू अनावर