आरसीबी आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान समालोचन करताना माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट व अनुष्कासंदर्भात टिप्पणी केली. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर म्हणाले, “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने”. लॉकडाउनमध्ये विराटने फक्त अनुष्काने केलेल्या गोलंदाजीवर सराव केला अशा अर्थाचं वाक्य गावसकरांनी उपरोधानं म्हटलं. परंतु नेटकऱ्यांनी व काही माध्यमांनी दुसराच अर्थ काढून गावसकरांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याचं सांगत टीकेची झोड उठवली आहे.
२४ सप्टेंबर २०२० रोजी, पंजाबविरोधातील सामन्यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पूर्णपणे अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणावेळी त्याने राहुलचे दोन झेल सोडले तर फलंदाजी करताना अपयशी ठरला. कोहली फक्त एक धाव काढून शेल्डन कॉट्रेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेसी फलंदाजी करण्यात अपयश आलं. यावेळी भारताचे माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या अपयशाचा समाचार घेताना म्हटलं की, “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने”. तर, “इन्होंने लॉकडाउनमे तो बस अनुष्काकी गेंदों की प्रॅक्टिस की है” असं न बोललेलं वाक्य गावसकरांच्या तोंडी घालत टीकेचा भडिमार केला आहे.
Gavaskar didn’t mean that. He meant Kohli practiced batting while Anushka bowled to him during Lockdown. Stop quoting that tweet ffs pic.twitter.com/ExQWLOp6Oz
— Cheeru ツ (@sobermonk) September 24, 2020
किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून टाकले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. कर्णधार के. एल. राहुलच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर पंजाबने तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला.