Traffic Police And Girl Crying Video : रस्त्यावर वाहन चालवताना प्रत्येकाने वाहतूकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे. हे नियम सर्वांसाठी समान आहेत. मग मुलगा असो वा मुलगी. नियम मोडल्यास तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. काही कारणास्तव तुमचे वाहन जप्त केले जाते. पण सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात एक तरुणी नो पार्किंगमध्ये पार्क केलेली स्कुटी वाहतूक पोलीस उचलून नेत असल्याने भररस्त्यात रडताना दिसतेय. पण पुढच्या क्षणी ती असं काही करते की पोलिसांनी तिची स्कुटी दया दाखवून सोडून दिली, त्यामुळे अनेकांनी मुलींनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, आम्ही मुलांनी पण असे केले तर आम्हालाही सोडून द्याल का?

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, वाहतूक पोलिस क्रेनच्या मदतीने नो-पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या गाड्या उचलून नेत आहेत. यात त्यांनी एका तरुणीची स्कुटी देखील उचलून गाडीत टाकली, पण तेव्हा तरुणी पाहते की, तिची स्कूटी वाहतूक पोलिसांनी उचलली, तेव्हा ती तिथे येते जोरजोरात रडू लागते. यावेळी ती रडत रडत वाहतूक पोलिसांशी बोलत स्कूटी परत देण्याची विनंती करतेय.

काहीवेळ रडून झाल्यानंतर आणि विनंती नंतर अखेर वाहतूक पोलीस तिची स्कूटी परत देण्यास सांगतात. याच वेळी तिथे उपस्थित लोकही त्या तरुणीकडे पाहत उभे राहतात. तर काहीजणांनी तिचा व्हिडिओ शूट करत तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काही लोक याबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर मोठ्या संख्येने तरुण युजर्स त्यावर संताप व्यक्त करत आहेत. कारण तरुणींसाठी वेगळा न्याय आणि तरुणांसाठी वेगळा असं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

तरुणीचा हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, सुरतमधील वाहतूक पोलिसांनी एका तरुणीची स्कूटी जप्त केली, यावेळी ती आपली स्कुटी सोडेपर्यंत जोरजोरात रडत वाहतूक पोलिसांना विनवणी करत राहिली.

या व्हिडीओवर आता युजर्सही एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, भावा, वाहतूक पोलीस काका तरुणीच्या रडण्याने वितळले वाटतं. तर दुसऱ्याने लिहिले की, आजपर्यंत मी ऐकले होते की मुलींचे सर्वात मोठे शस्त्र त्यांचे अश्रू असतात… आज मी ते पाहिले आहे. तिसऱ्याने लिहिले की, काका, तुम्ही आमच्या मुलांशी भेदभाव करता हे खरं आहे.