भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा खेळापेक्षा जास्त मानला जातो. या दोन्ही देशांमध्ये या खेळाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, हे अनेकदा पाहायला मिळते. क्रिकेटप्रेमीचा असाच एक व्हिडीओ पाकिस्तानमधून समोर आला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक लहान चाहता संघाच्या पराभवाने इतका दु:खी झाला होता की तो ढसाढसा रडू लागला होता. या मुलाचे कुटुंबीय सांत्वन करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मुलाचे कुटुंबीय त्याला “काही हरकत नाही बेटा, हार-जीत हा खेळाचा भाग आहे” असे सांगताना ऐकू येत आहे.

( हे ही वाचा: गुजराती व्यावसायिकाने मुलाच्या लग्नासाठी छापली ४ किलोची लग्नपत्रिका; किंमत सात हजार रुपये! )

व्हिडीओ शेअर करताना शोएब अख्तरने लिहिले की, “जेव्हा तुमची टीम चांगली खेळते तेव्हा असे होते. चाहते संघाशी जोडले जातात. त्यामुळे विश्वचषक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.” व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या पाकिस्तानी टीमच्या या छोट्या चाहत्याचे नाव सालेह आहे. मुलाने पाकिस्तान संघाची ११ क्रमांकाची जर्सी घातली आहे. पराभवामुळे निराश झालेला सालेह व्हिडीओमध्ये रडताना दिसत आहे. तो खूप संतापलेलेही दिसत आहेत. आजूबाजूचे लोकही त्याला समजावून सांगत आहेत, पण सालेहला रडू आवरता येत नाही.

( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेह-यावर आलं हसू )

उपांत्य फेरीचे दोन्ही सामने पूर्ण होत २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेचे अंतिम फेरीचे स्पर्धक निश्चित झाले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विश्वचषक फायनलमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येणार आहेत. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने एकदिवसीय विश्वचषक चॅम्पियन इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला होता. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता अंतिम सामना खेळवला जाईल.