तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अफगाणी नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. तालिबान्यांपासून आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी अफगाणी नागरिक प्रयत्न करत आहेत. एकीकडे लाखो नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे या उलट काही अफगाणी नागरिक विविध मार्गाने तालिबान्यांना विरोधदेखील करताना दिसत आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तालिबान्यांनी एका मुलाकडून अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज हिसकावून घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इनसायडर पेपर’ने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर अफागाणिस्तानमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तालिबानी हातात हत्यारे घेऊन फिरताना दिसत आहेत. दरम्यान रस्त्यावर एक अफगाणी मुलगा सायकलवरुन फिरत असतो. त्या मुलाकडे अफगाणिस्तानचा राष्ट्रध्वज असतो. तो राष्ट्रध्वज पाहून एक तालिबानी गाडीतून खाली उतरतो आणि त्या मुलाकडे पळत जाते. त्या मुलाच्या हातातील झेंडा तो हिसकावून घेता आणि त्याला मारताना दिसतोय. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video: हृदय पिळवटून टाकणारा अफगाणी महिलेचा व्हिडीओ, तान्ह्या बाळाला त्या आईने…

यापूर्वी काबूल विमानतळावरील अनेक व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओमध्ये अनेक महिला अमेरिकन सैन्याकडे मदत मागताना दिसत होत्या. ‘तालिबानी येत आहेत, आम्हाला वाचवा, आमची मदत करा’ असे त्या जीवाच्या आकांताने ओरडात होत्या. सध्या अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष करून महिला वर्गामध्ये दहशत पसरली आहे. अनेक अफगाणी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधील दाहकतेचे वास्तव पाहून कुणाच्याही काळजाला तडे जातील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Talibani snach flag of afghanistan from young citizen avb
First published on: 21-08-2021 at 17:27 IST