Son Assaulting Father Over Property: वडील-मुलांच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना तमीळनाडूमधून समोर आली आहे.संपत्तीचा मोह अनावर झालेल्या मुलानेच वडिलांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आपली मुलं सुखात रहावीत म्हणून आई-वडील काहीही करू शकतात, त्यांच्यासाठी ते अपार कष्ट करतात. पण काही मुलांना याची जाणीव नसते, आणि ते आपल्याच जन्मदात्यांना त्रास देतात. पैशांचा हव्यास माणसाला कोणत्याही थराला घेऊन जाऊ शकतो. हे या समोर आलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही संतप्त व्हाल.

संपत्तीसाठी लेक झाला हैवान

ही घटना तामिळनाडूच्या पेरांबलूर जिल्ह्यात घडली असून संतोष असे आरोपी मुलाचे नाव आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आरोपी संतोष घरात येण्यापूर्वी त्याचे वडिल घरात खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यानंतर संतोष त्याठिकाणी येतो आणि वडिलांवर हल्ला करण्यास सुरुवात करतो. वडिलांना तो वारंवार ठोसे मारताना दिसत आहे. आपल्याच वडिलांना अमानुषपणे हा आरोपी मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच त्यांच्या कानशीलात लगावतो. यानंतर एक व्यक्ती यात मध्यस्थी करून संतोषला थांबवतो.

वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

संपत्तीवरुन आरोपीचा वडील कुलंथाइवेलू यांच्याशी वाद झाला होता. त्याच रागातून त्याने कुलंथाइवेलू यांच्यावर हल्ला केला आणि काही समजण्याच्या आत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीनंतर काही व्यक्तींनी कुलंथाइवेलू यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार १८ एप्रिल रोजी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ई-रिक्षाचालकाचा यूटर्न बेतला जीवावर; क्षणात शरीरातून…२१ वर्षीय तरुणाचा भयावह अंत

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी संतोषला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संतोषवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ आणि ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही लोक आपल्या आई-वडिलांना खूप जीव लावतात. त्यांनी ज्या प्रकारे त्यांना लहानाचं मोठं केलं तसंच तेही त्यांची वृद्धपणी काळजी घेताना दिसतात. मात्र असे काही क्रूर मुलं असतात जे आपल्याच आई वडिलांना अजिबात साथ देत नाहीत. वृद्धपणी त्यांची काळजी घेणं सोडा पण साधी नीट वागणूकही देत नाहीत.