सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूतील ट्रक आणि कारच्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात तामिळनाडूतील सेलम येथे पहाटे झाला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भरधाव वेगात आलेली कार महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकल्याचं दिसत आहे. कारने ट्रकला एवढ्या जोरात धडक दिली आहे की, या धडकेत कारमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास झालेल्या हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ वृत्तसंस्था पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील येंगूर येथील एका कुटुंबातील आठ जण कारमधून पेरुनथुराईला निघाले होते. सेलम-इरोड महामार्गावर पहाटे ४ वाजता कार भरधाव वेगात जात होती. यावेळी ती महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून धडकली. कारचा वेग एवढा होता ती थेट ट्रकच्या खाली घुसल्याच दिसत आहे. या अपघातामध्ये कारमधील आठ जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. तर या मुलाच्या आई आणि वडिलांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- धावत्या ट्रेनमधून पडल्याने एका व्यक्तीचा तुटला हात, तुटलेला हात घेऊन धावत रुग्णालयात गेला अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून कारचा चालक विघ्नेश आणि अन्य प्रवासी प्रिया यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच कारमध्ये यांत्रिक बिघाड झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.