टांझानियातील ‘त्या’ भावंडांचा नवा VIDEO VIRAL ; कतरिना कैफच्या ‘Tip Tip Barsa Paani’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना एका टांझानियातील भांवडांचा शेरशाह चित्रपटातील ‘राता लंबिया’ या गाण्यावरचा व्हिडीओ तुमच्या नजरेस पडला असेल. आता त्यांना आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा नवा व्हिडीओ एकदा पाहाच.

tanzanian-Kili-Paul-Neema-Paul-viral-video
(Photo: Instagram/ kili_paul's profile picture kili_paul)

तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना एका टांझानियातील भांवडांचा शेरशाह चित्रपटातील ‘राता लंबिया’ या गाण्यावरचा व्हिडीओ तुमच्या नजरेस पडला असेल. गेल्या काही दिवसांपासून टांझानियातील या भावंडांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हे भावंडं टांझानिया देशातील असले तरी अगदी भारतातून सुद्धा त्यांना प्रचंड प्रेम मिळू लागलंय. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या टांझानियातील भावंडांचा आणखी एक नवा व्हिडीओ व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिचं सुपरहिट गाणं ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर तुफान डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना खूपच आवडू लागला आहे. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पाहाच.

टांझानियातील रहिवासी असलेले भाऊ-बहिण किली पॉल आणि त्याची बहीण नीमा पॉल पुन्हा एकदा या नव्या व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बहिण नीमा पॉल ही कॅमेऱ्यासमोर उभी असते आणि काही वेळाने तिच्या मागे तिचा भाऊ किली पॉल दिसून येतो. इन्स्टाग्रामवर सध्या ट्रेंड होत असलेल्या ‘टिप टिप बरसा पानी’ या अभिनेत्री कतरिना कैफच्या सुपरहिट गाण्यावर दोघे लिप-सिंक करताना दिसून येत आहेत. ज्यावेळी तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहाल त्यावेळी दोघा भाऊ-बहिणीने केलेली याच गाण्यावरील हूक स्टेप पाहून आश्चर्य व्हाल. दोघांनीही खूपच सुंदर पद्धतीने या गाण्यावर डान्स करत आपल्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सनी लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. हे दोघेही भावंडं अगदी मनापासून डान्स करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वादळात तरंगणारे जहाज तर कुठे अनोख्या माशांनी वेढलेले खलाशी! समुद्रातील अद्भुत क्षण तुम्हाला आश्चर्यचकित करतील !

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न सुरू असताना स्टेजवर प्रियकराची एन्ट्री, नवरदेवासमोरच प्रेयसीच्या भांगेत सिंदूर भरलं आणि….

किली पॉल याने त्याच्या इन्स्टाग्रामवरून हा नवा व्हिडीओ शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. दोघे भाऊ-बहिणी डान्स करत असताना अभिनेत्री कतरिना कैफचं हे गाणं एन्जॉय करताना दिसून येत होते.

काही दिवसांपूर्वीच या दोघा बहिणींनी शेरशाह चित्रपटातील ‘राता लंबिया’ या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर हे दोघे बहिणी सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार बनले. त्यानंतर या दोघा भाऊ-बहिणींनी मागे वळून पाहिलं नाही आणि लागोपाठ वेगवेगळे व्हिडीओ शेअर करण्यास सुरूवात केली.

आणखी वाचा : Wedding Gift : काहीही हं! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला जे गिफ्ट दिलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल, हा VIRAL VIDEO पाहाच…

नुकंतच शेअर केलेल्या या नव्या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाख १२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. तसंच १,५५७ लोकांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत कमेंट्स केल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tanzanian siblings lip sync dance to katrina kaifs tip tip barsa pani in viral video superb says internet prp

ताज्या बातम्या