तेलंगणातील एका महिलेने आपल्या मुलाच्या गांजाच्या व्यसनासाठी शिक्षा देण्यासाठी त्याला खांबाला बांधून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर चोळली. तेलंगणातील सूर्यपेट जिल्ह्यातील कोडाड येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

नक्की काय झालं?

१५ वर्षांचा मुलगा गांजाच्या आहारी गेल्याने चिंतेत महिलेने त्याला खांबाला बांधले. एवढ्यावरच न थांबता दुसर्‍या महिलेने हात धरताच तिने त्याच्या डोळ्यात मिरचीपूड चोळली. जळजळ झाल्यामुळे तरुण ओरडताना ऐकू आला, तर काही शेजाऱ्यांनी मुलाच्या आईला पाणी टाकण्याचा सल्ला दिला. गांजा ओढण्याची सवय सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतरच महिलेने आपल्या मुलाला सोडले.

(हे ही वाचा: Viral Photo: तुम्ही ‘या’ फोटोतला टोळ शोधू शकता का?)

(हे ही वाचा: ‘चका चक’ गाण्यावरचा ‘या’ चिमुकलीचा डान्स एकदा बघाच, व्हिडीओ होतोय Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढी कठोर शिक्षा का?

आईने ऐवढी कठोर शिक्षा केली कारण तो शाळा बंक करत होता आणि गांजा पीत होता. वारंवार सांगूनही तो सुधारला नाही. पालक मुलांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांना शिक्षा करतात हे ग्रामीण तेलंगणात नवीन नाही, परंतु ही जुनी पद्धत उपयुक्त ठरेल की नाही याची या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही नेटिझन्सनी असे सुचवले की हे प्रतिउत्पादक ठरू शकते.