पुणे शहर म्हटलं सर्वांना वाहतूक कोंडी आणि वाहतूक नियम मोडणारे वाहन चालक आठवतात. पुण्यातील वाहनचालकांचा हा बेशिस्तपणा ही शहराची ओळख बनत चालला आहे ही अत्यंत चिंतेची बाबत आहे. बेशिस्त वाहनचालकांच्या नियम उल्लंघन आणि अपघाताचे व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता या व्हिडीओमध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडलेली आहे. नुकताच पुण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
एका कारच्या डॅश कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला असून हे फुटेज चर्चेत आले आहे. फुटेजनुसार, हा व्हिडिओ १० मेच्या दुपारचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नेहमीच गर्दी असलेल्या एमजी रोडवर एक दुचाकीस्वार वेगाने दुचाकी चालवत आहे तर अचानक दोन मोपेड स्वार रस्ता ओलांडताना समोर येतात. ज्यामुळे भरधाव वेगात धावणारा दुचाकीस्वार रस्ता ओलांडणाऱ्या एका दुचाकीस्वाराला धडकतो आणि जमिनीवर आपडतो. अपघात झाल्यानंतर रस्ता ओलांडणारे दोन्ही दुचाकीस्वार आणि कार जागीच थांबतात. दुचाकीवरून पडलेला दुचाकीस्वार सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी काही लोक धावत त्याच्याजवळ येतात. यादरम्यान, मोपेड स्वार हळूच घटनास्थळावरून पळून जातो.
दरम्यान व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणत आहेत की, मोपेड चालकाची काही चूक नव्हती कारण दुचाकीस्वार भरधाव वेगात दुचाकी चालवत होता.
“दुचाकीस्वार अत्यंत वेगात, बेपर्वाईने वाहन चालव होता आणि मध्यम वर्दळीच्या रस्त्यावर लेन शिस्तीचे पालनही करत नव्हता – आणि एमहात्मा गांधी रस्त्यावरील मुख्य लेन तितकी रुंद नव्हती. स्कूटरवाला जवळजवळ ७०% क्रॉसिंगवर होता आणि दुसऱ्या माणसाच्या मागे होता, म्हणून तो येणाऱ्या बाईकरला पाहू शकला नसता जो खरंतर वेगात येत होता. ‘हिट अँड रन’ माणसाने वाट पाहिली असती का? हो, पण मग सर्वांनी त्याच्यावर झडप घातली असती आणि कदाचित तो घाबरला असता आणि या ‘लढाई किंवा पळून जा’ परिस्थितीत तो पळून जाण्याचा पर्याय निवडला असता,” एका वापरकर्त्याने लिहिले.
“हा एक अपघात आहे. काकांना हा रेसर पूर्ण वेगाने येताना दिसत नव्हता. मला यात काहीही चुकीचे दिसत नाही. त्या काकांनी त्याची स्कूटी थोडी पुढे सरकवली – कदाचित चुकून – पण तो माणूस इतक्या वेगाने येत होता. ही काकांची चूक नव्हती. आनंद आहे की, तो विनाकारण मारहाण होण्यासाठी थांबला नाही,” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.
“या बाईकर्सना वाटते की, ते रेसिंग ट्रॅकवर आहेत. फक्त रस्ता एकेरी असल्याने तुम्ही एका सेकंदात अगदी डावीकडून अगदी उजवीकडे जाऊ शकता असे नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले.
“हे हिट अँड रन नाही. हा अपघात आहे आणि जवळजवळ सर्व दोष वेगवान व्यक्तीचा आहे. तो वेगाने गाडी चालवत होता आणि एका घट्ट अंतरावर बेपर्वा युक्ती करण्याचा प्रयत्न करत होता. मला माहित नाही की तुम्ही रस्ता ओलांडणाऱ्या वाहनाला दोष देऊ शकता का,” चौथ्या वापरकर्त्याने टोमणा मारला.