Lion Stands Next to Man Viral Video: जंगल सफारी म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात थरार आणि रोमांच अनुभवण्याचा आनंद. पण जर तुम्ही जंगलाच्या मधोमध उभे असताना एखादा सिंह अगदी तुमच्या शेजारी येऊन उभा राहिला, तर काय होईल? अगदी असाच थरारक अनुभव काही तरुणांनी जंगलात फोटोग्राफी करीत असताना घेतला, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
जंगल सफारीचा थरार अनुभवणं जितकं रोमांचक, तितकंच धोकादायकही ठरू शकतं. जंगलात हिंस्र प्राणी कधी, कुठून, कसे प्रकटतील याचा काही नेम नाही. अनेकदा पर्यटकांना त्यांच्या अगदी जवळून वाघ, सिंह, हत्ती यांसारख्या प्राण्यांचा थरारक सामना करावा लागतो. सध्या सोशल मीडियावर एक असाच अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगल सफारीदरम्यान पर्यटकांच्या जीपसमोर अचानक सिंह येऊन थांबतो… आणि पुढे काय घडतं, हे पाहूनच तुमच्या काळजाचे ठोके चुकतील.
सिंह आला अन् सैरभैर झाले सगळे
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, काही तरुण जंगल सफारीसाठी गेले होते. त्यांनी आपल्या गाडीला एका ठिकाणी थांबवलं आणि गाडीबाहेर येऊन मस्ती करीत फोटो काढायला सुरुवात केली. त्यातील एक जण तर गाडीच्या बोनेटवर बसून स्टायलिश पोज देत फोटोशूट करीत होता. वातावरण अगदी मजेत होतं… पण तेवढ्यातच एक सिंह अगदी दबकत तिथे आला आणि गाडीच्या अगदी शेजारी येऊन उभा राहिला.
फोटोशूटमध्ये गुंग असलेल्या मित्राने जसे सिंहाला पाहिले, तसा तो जागेवरच थिजून गेला. इतका की त्याच्या चेहऱ्यावर तर भीती स्पष्ट दिसत होती; पण अगदी त्याचं शरीरही हलेनासं झालं. गाडीमध्ये बसलेले बाकीचे मित्रही क्षणात हादरले. सिंह फार वेळ त्यांच्या शेजारी उभा होता; पण ते इतके बिनधास्त होते की, कोणालाच त्याची चाहूल लागली नाही.
व्हिडीओवर कोटींच्या घरात व्ह्युज
हा थरारक व्हिडीओ ट्विटर/X वर @TheFigen_ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला १.५ कोटीहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी कमेंट करीत विचारलं, “हे लोक अजूनही जिवंत आहेत का?” तर काहींनी जंगलातील असेच काही अंगावर काटा आणणारे व्हिडीओज शेअर करीत जंगलाच्या गूढ दुनियेचं दर्शन घडवलं.
येथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ पाहून अनेकांना वाटलं, जणू सिंहच म्हणतोय, “हो, आधी थोडी मस्ती करा, शेवटी तर तुम्ही माझं जेवण होणारच आहात.”, असं विनोदी आणि थरारक मिश्रण असलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे.
डिस्क्लेमर : ही माहिती सोशल मीडियावर उपलब्ध व्हिडीओवर आधारित आहे. यातील घटनांची पुष्टी आम्ही करत नाही.