Turmeric Water Trend Gone Wrong: सोशल मीडियावर रोज नवनवीन ट्रेंड्स येतात आणि लोकही ते फॉलो करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर हळदीची चांगली चर्चा रंगली आहे. पाणी आणि हळदीचा एक भन्नाट ट्रेंड जगभरात लोकप्रिय होत असून, अनेक लोक यावर रील्स, व्हिडीओ बनविताना दिसत आहेत. ‘टर्मरिक ग्लो ट्रेंड’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्हायरल रीलमध्ये लोक घरातल्याच सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून, मोबाईलचा टॉर्च आणि पाण्यात हळद टाकून झगमगती दृश्ये तयार करीत आहेत. अनेकांनी घरात आणि ओपन स्पेसमध्ये याचे रेकॉर्डिंग करीत इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहे. पाहायला हा व्हिडीओ नक्कीच सुंदर वाटतो, म्हणूनच अनेक जण हा ‘हल्दी ट्रेंड’ फॉलो करीत आहेत. पण जरा थांबा. मजेसाठी बनवलेला हा व्हिडीओ कधी तुमच्या जीवावर बेतू शकतो याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. एक तरुण हा ट्रेंड फॉलो करताना जवळपास जीव गमावणार होता… आणि तो संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक युवक एका तलावात उतरतो आणि त्यात हळद मिसळतो. प्रारंभी सगळं सुरळीत दिसतं; पण काही सेकंदांतच दृश्यात भीषणता येते. अचानक पाण्यातून एक साप फणा काढत समोर येतो आणि युवकाकडे झेपावतो. हे दृश्य इतकं धक्कादायक आहे की, क्षणभर त्यावर विश्वासच बसत नाही.
साप दिसताच युवक अक्षरशः घाबरतो. त्याला घाम फुटतो आणि तो जीव वाचवण्यासाठी धडपडत तलावातून बाहेर पडू लागतो. घसरत, पडत, धावत तो कसाबसा बाहेर निघतो आणि हाच तो क्षण आहे, जो लाखो लोकांनी पाहिला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला.
हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्राम युजर @sanu_ansari1222 ने शेअर केला असून, त्याला हजारो लाइक्स आणि मजेदार कमेंट्स मिळत आहेत. एका युजरनं लिहिलं, “भाऊ, तू तर बचावलास! नाही तर सापानंच ‘नवा ट्रेंड’ सुरू केला असता!” तर दुसऱ्याने कमेंट केली, “साप आला अन् व्हिडीओला स्टार बनवून गेला!”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशाने शेअर करण्यात आला आहे. घटनांची अधिकृत पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ट्रेंड फॉलो करताना निसर्गाची गंमतही लक्षात घ्यावी लागते.
Disclaimer: हा व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशाने बघावा. त्यामधील सत्यतेची पुष्टी करण्यात आलेली नाही.