Thane Crime News: ३० वर्षीय महिलेने इतर चार जणांसह तिच्या प्रियकराला मारहाण करून लाखो रुपयांचा ऐवज लुटून नग्नावस्थेत शहापूर महामार्गावर फेकून दिल्याची घटना समोर येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाविका भोईर आणि नदीम खान अशी पाच आरोपींपैकी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालाजी शिवभगत हा शहापूर येथील रहिवासी असून त्याचा बांधकाम व्यवसाय आहे. भाविका भोईर या शहापूर येथील तरुणीशी त्याचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

२८ जून रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास भोईर यांनी शिवभगत यांना शहापूर येथील आटगाव महामार्गावरील एका ठिकाणी बोलावले. दोघेही गप्पा मारत असताना भाविका भोईरचे चार साथीदार तिथे आले आणि बालाजीवर प्राणघातक हल्ला केला. मध्यरात्रीपर्यंत हे पाचजण त्याला मारहाण करतच होते त्यांनतर दुसर्‍या दिवशी पहाटे त्याचे कपडे काढून नग्नावस्थेतच त्याला शहापूर महामार्गावर फेकून देण्यात आले.

‘त्या’ रात्री नेमकं घडलं काय?…

या घटनेनंतर शिवभगत, दोन दिवस रुग्णालयात दाखल होता आणि अजूनही आघातातून सावरलेला नाही. त्याने पोलिसांशी बोलताना सांगितले की “मी तिच्यासाठी सर्व काही केले, तिच्या इच्छेनुसार एक छोटेसे घर बांधले, तिच्यासाठी खरेदी केली. तिने दुसर्‍या माणसासाठी माझा विश्वासघात केला आणि माझ्यावर क्रूरपणे हल्ला केला. भाविकाने साडी, सोन्याचे झुमके, सोन्याचे पैंजण, बांगड्या, नवीन पावसाळी शूज छत्री सगळं घेऊन आटगाव हायवेवर बोलवलं होतं मी पोहोचताच ती गाडीत (क्रेटा) बसली, गिफ्ट्स घेतले आणि तेव्हा अचानक चार जण, त्यापैकी तीन अज्ञात, कारमध्ये घुसले, त्यांनी मला बाजूला ढकलले आणि माझ्या डोक्यावर चॉपरने हल्ला केला. त्यापैकी एकाने गाडी चालवायला सुरुवात केली

शहापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले की, आरोपींनी शिवभगत यांना नंतर एका बंद अनोळखी रेस्टॉरंटमध्ये नेले आणि सकाळपर्यंत मारहाण केली, आरोपीने पीडित व्यक्तीचे कपडे काढल्यानंतर त्याचा व्हिडिओ शूट केला शिवाय त्याच्या दोन सोन्याच्या साखळ्या, सात अंगठ्या काढून घेतल्या, त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि पहाटे पाचच्या सुमारास पळ काढला. स्वत:चा बचाव करण्यासाठी पीडित बालाजीने पोलिस स्टेशन गाठले आणि मदतीसाठी त्याच्या मित्रांना बोलावले ज्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाच आरोपींवर आयपीसी कलम 365 (एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने ओलीस ठेवणे किंवा बंदिस्त करण्याच्या हेतूने अपहरण), 506 (धमकी) आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सखोल तपास सुरु आहे.