Elephant Herd Attacks Kerala :वन्य प्राण्यांचे मानवीवस्तीत शिरकाव आणि हल्ले अशा घटना वाढत आहेत. मानव जंगलांमध्ये अतिक्रमण करतो, त्यांचं नैसर्गिक अधिवास नष्ट करतो, जंगलात कचरा टाकतो, लाऊडस्पीकर लावतो, किंवा शिस्तभंग करतो वनातील शांती भंग करतो ज्यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन विस्कळीत होते त्यामुळे ते अस्वस्थ होतात. जेव्हा वन्य प्राण्यांना मानवापासून धोका जाणवतो तेव्हाच स्वत:च्या संरक्षणासाठी ते हल्ला करतात. वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे कित्येक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

केरळमधील करुवरकुंडूच्या थुव्वुर आणि इरिंगाट्टीरी भागातील निवासी भागात तीन हत्तींच्या कळपाने कहर केल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जंगली हत्तींनी अनेक वाहनांवर हल्ला केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तीन हत्ती रस्त्यावरून सैरभैर पळत असल्याचे दिसून आले आहे, दरम्यान ते एक वाहनांकडे धावत आहेत. एका हत्तीने एका मिनी पिकअप ट्रकवर हल्ला केला. जोरदार धडकेमुळे पुढचा भाग उचलला आणि मागे ढकलला गेला. स्थानिक आणि अधिकारी घटनास्थळी धावत असताना, प्राणी जंगलात गायब झाले. सुदैवाने वाहनामध्ये कोणीही नव्हते.

व्हिडिओ शेअर करताना, निसार कुरिक्कल नावाच्या एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, “केरळमधील करुवरकुंडूमध्ये हत्तींच्या कळपाने वाहनांवर हल्ला केल्याचा आणि लोकांमध्ये भीती निर्माण झाल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे.”

व्हिडिओ येथे पहा:

ओन्मानोरमामधील एका वृत्तानुसार, हत्तींनी परायिन्कुन्नू वनक्षेत्रातून भटकंती केली आणि अनेक वाहने, पिके नष्ट केली आणि स्थानिकांना जखमी केले.

अहवालात असे म्हटले आहे की,”अक्करकुलममधील एका वस्तीच्या परिसरातून जाताना एक हत्ती विहिरीत पडला. वन अधिकाऱ्यांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर हत्तींना जंगलात परत हाकलून लावण्यात आले.

या आठवड्याच्या सुरुवातीला, देहरादून महामार्गावर कंवरिया तळ ठोकत असताना एका मादी हत्तीणीने आणि तिच्या पिल्लाने ट्रॅक्टर ट्रॉलीवर हल्ला केला. “आम्ही संवर्धनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करत राहतो. यात्रेकरू दिवसभर लाऊडस्पीकरवर संगीत वाजवतात, त्यामुळे रात्री आणि वनक्षेत्राजवळ लाऊडस्पीकरवर संगीत वाजवण्याविरुद्ध सूचना असूनही त्यांनी ते बंद केले नाही. या घटनेत एक माणूस जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले,” असे विभागीय वन अधिकारी नीरज शर्मा म्हणाले.

हरिद्वार पोलिसांनी ध्वनी नियंत्रणाबाबत स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात, परवानगी असलेल्या ध्वनी पातळी, आकार मर्यादा आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर तीन डझनहून अधिक डीजे सिस्टीम परत पाठवण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा घटनांचे व्हिडिओ पाहून आपण केवळ व्हायरल कंटेंटचा भाग न बनता, निसर्ग संवर्धन आणि सतर्कतेसाठी पावलं उचलली पाहिजेत.