मिरवणूक घेऊन येणा-या वराला बाल्कनीतून वधूने दिलं फ्लाइंग किस; व्हिडीओ पाहून नेटीझन्सने दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

लग्नाचा हा मजेदार व्हिडीओ इतका सुंदर आणि क्यूट आहे की, तो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

viral video of bride
व्हायरल व्हिडीओ (फोटो: witty_wedding / Instagram )

सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा प्रकार लोकांना खूप आवडतो. आजकाल लग्नाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नाचा हा मजेदार व्हिडीओ इतका सुंदर आणि क्यूट आहे की, तो पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. या व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की वधू तिच्या लग्नाच्या दिवशी स्वतःला थांबवू शकत नाही आणि मिरवणूक पाहण्यासाठी बाल्कनीत पोहोचते. यानंतर वधूला तिची मिरवणूक पाहून खूप आनंद होतो.

वधू वरला ओरडून म्हणते..

व्हिडीओमध्ये दिसत आहे की वर खाली वधूच्या घरी मिरवणूक घेऊन येत आहे. या दरम्यान आवाज वाजतो आणि मिरवणुकीतील लोक नाचत असतात. मग वधू ओरडून वराला वर बघायला सांगते. वर वरती बघताच , वधू वराला फ्लाइंग किस करते.

( हे ही वाचा: Viral Video: लग्नात पंडितजींच्या प्रश्नावर ‘नवरदेव’ फसला; उत्तर ऐकून एकच हशा पिकला! )

नेटीझन्सला आवडला व्हिडीओ

आता हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये वधू खूप सुंदर दिसत आहे. विटी वेडिंग नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, वधू लपून मिरवणूक पाहत होती, तिच्या वराची वाट पाहू शकली नाही. आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.

( हे ही वाचा: Gold: सर्वात स्वस्त सोनं ‘इथे’ उपलब्ध; १० ग्रॅमवर बंपर सवलत! )

( हे ही वाचा: T20 World Cup: भारताविरुद्ध पाकिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतर मोमीन साकिबचा व्हिडीओ व्हायरल! )

अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. एक वापरकर्ता कमेंट करतो की “वधूच्या चेहऱ्यावरच हास्य यातच सगळं आलं” तर दुसरा वापरकर्ता लिहतो की “सुंदर व्हिडीओ”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The bride gave a flying kiss from the balcony to the groom who brought the barat netizens reacted by watching the video ttg