भारतात बैल सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैल उत्सवाचे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडीयावर व्हायरल होतात. त्यातले असे काही व्हिडीओ असतात जे तुम्हाला आश्चर्यचकित करतात. दरम्यान असाच एका धक्कादायक व्हिडीओमध्ये लोक बैलासमोर धावताना दिसत आहेत आणि यातूनच एक दुर्घटनाही होते. याचाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बैलाने महिलेला दिली धडक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये दक्षिण भारतात कुठेतरी बैल महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे दिसत आहे. तेथे एक व्यक्ती आपल्या बाईकवरून जात होती. त्याच्या मागे एक महिला बसली होती. काही क्षणातचं मागून येणाऱ्या बैलाने त्यांना धडक दिली. मात्र, सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे बाईक चालवणारा व्यक्ती थोडक्यात बचावला, मात्र मागे बसलेली महिला हवेत उडून जमिनीवर पडली.

(हे ही वाचा: Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय)

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल

घटनेच्या वेळी तेथे उपस्थित लोकांनी महिलेला लगेच मदत केली. काही सेकंदांचा हा व्हिडीओ नक्कीच इशारा देऊ शकतो की बैलापासून नेहमी अंतर ठेवावे, कारण तो कधीही आणि कुठेही हल्ला करू शकतो. या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. हा व्हिडिओ मिमवालान्यूजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.