तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील आफमिली त्यांच्या पाळीव कुत्र्यासाठी डोहाळे जेवण आयोजित करून त्याच्याबद्दल प्रेम दाखवण्यासाठी एक पाऊल पुढे गेले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्याभोवती लाल कपडा गुंडाळालेला आहे. तिच्या गळ्यात हारही आहे. हा फोटो कुत्र्याच्या डोहाळजेवणाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या विधीचा असल्याचे दिसते.

कशी समजली गोड बातमी?

कुमारेसन हे उप्पकोट्टईचे रहिवासी आहेत आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुमारेसन यांना लहान असताना हे पिल्लू भेटले होते. तथापि, जसजसा वेळ निघून गेला, त्यांनी अधिकाधिक कुत्रे दत्तक घेतले आणि आता त्यांच्याकडे एकूण १० कुत्रे आहेत. तीन वर्षापूर्वी कुमारेसनने तिला आपल्या घरी आणले तेव्हा रेशम एक पिल्लू होते. जेव्हा रेशमला ठीक वाटत न्हवते तेव्हा तेव्हा कुमारेसन तिला एका पशुवैद्यकाकडे घेऊन गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की ती गर्भवती आहे आणि तीन महिन्यांत पिल्लांना जन्म देईल.

(हे ही वाचा: म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी रस्त्यावर सादर केलं गाणं; हृतिक रोशननेही केलं कौतुक )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुमारेसनच्या कुटुंबाने रेशमासाठी डोहाळजेवण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या नातेवाईकांनाही आमंत्रित केले. हा एक भव्य सोहळा होता. हा सोहळा शेजाऱ्यांना आश्चर्यचकित करणारा होता कारण रेशीमला नवीन कपड्यांमध्येही सजवण्यात आलं होतं. ” पाळीव प्राण्यांपेक्षा ते नेहमीच आमच्या कुटुंबाचे सदस्य राहिले आहेत. आम्ही जे काही खातो ते आम्ही आमच्या पाळीव प्राण्यांसोबत शेअर करतो. म्हणून जेव्हा आम्हाला कळले की रेशीम गर्भवती आहे, तेव्हा आम्हाला एक सोहळा करायचा होता.” कुमारसन म्हणाले.