“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे” विंदा करंदीकर यांच्या कवीतेतील ही ओळ तुम्ही नेहमी ऐकली असेल. या ओळीचा अर्थ असा होतो की, नेहमी दुसऱ्याने काहीतरी देण्याची वृत्ती असली पाहिजे. घेण्याऱ्या व्यक्तीने एक दिवस काहीतरी देण्याची वृत्तीही आत्मसात केली पाहिजे. या कवितेप्रमाणे जर प्रत्येक व्यक्ती वागला तर जग खरंच किती सुंदर होईल ना.
कोणाला काहीतरी देण्यासाठी व्यक्तीचं मन मोठं असावं लागतं तरच तो त्याच्याजवळ असेल ते दुसऱ्याला देऊ शकतो. मोठ्या मनाने इतरांना नेहमी काही काही देत राहणारे लोक फार कमी असतात पण एक व्यक्ती असा आहे जो नेहमी दुसऱ्यांना काही ना काही देत असतो तो म्हणजे शेतकरी. शेतकरी हा शेतात कष्ट करून शेती करतो आणि त्याच्या मेहनतीमुळेच आपल्याल धान्य-भाजीपाला मुबलक प्रमाणात मिळत आहे. शेतकऱ्याचं मन किती मोठं असते हे दर्शवणारा हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एका रस्त्यावर ऊसाने भरलेला ट्रक जाताना दिसत आहेत. त्या टॅकच्या समोर एक हत्तीण आणि उभे असल्याचे दिसत आहे. भुकेल्या हत्तींना पाहून ट्रकवर उभा असलेला शेतकरी त्यांच्यासाठी ऊस रस्त्याच्या बाजूला टाकतो. ऊस पाहून भुकेले हत्ती लगेच ट्रक समोरून बाजूला जाऊन उभे राहतात. हत्ती रस्त्यावरून बाजूला गेल्यानंतर ट्रक लगेच तेथून जाऊ शकत होता पण तसे न करता त्या हत्तींना आणखी ऊस खायला दिला आहे. भुकेल्या हत्तींना केलेली मदत पाहून लोक भावूक होत आहे.
इंस्टाग्रामवर __golden_words___ नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एकाने लिहिले, “काश सर्वांच मन इतकं मोठं असतं” दुसऱ्याने लिहिले, ज्या शेतकऱ्याचा हा ऊस आहे तो त्याचं मन मोठं आहे”