जगातील सगळ्यात वेगवान इंटरनेट लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या एका सेकंदात १५० चित्रपट डाउनलोड करता येणार आहेत. चिनी कंपनीने जगातील सर्वांत वेगवान इंटरनेट नेटवर्कचे अनावरण केले आहे आणि असा दावा केला आहे की, प्रतिसेकंद १.२ (टेराबिट) वेगात डेटा प्रसारित करू शकते. तसेच हा वेग सध्याच्या प्रमुख इंटरनेट मार्गांपेक्षा १० पट अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सिंघुआ युनिव्हर्सिटी, चायना मोबाईल, हुआवेई टेक्नॉलॉजीज व सर्नेट कॉर्पोरेशन यांनी मिळून हा प्रकल्प तयार केला आहे.

तीन हजार (3,000) किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले हे नेटवर्क चीनच्या बीजिंग, वुहान व ग्वांगझूला एका विस्तृत ऑप्टिकल फायबर केबलिंग प्रणालीद्वारे जोडते आणि १.२ टेराबिट (1.2 terabits) म्हणजेच १२०० गिगाबिट्स (1,200 gigabits) प्रतिसेकंद या वेगाने डेटा प्रसारित करण्याची क्षमता या वेगवान इंटरनेट मध्ये आहे. जगातील बहुतेक इंटरनेट बॅकबोन नेटवर्क फक्त १०० गिगाबिट्स (100 gigabits) प्रतिसेकंद वेगाने कार्य करतात.

विशेष म्हणजे, बीजिंग, वुहान, गुआंगझू कनेक्शन (Beijing-Wuhan-Guangzhou connection) चीनच्या भविष्यातील इंटरनेट तंत्रज्ञान पायाभूत सुविधांचा एक भाग आहे. एक दशकभर चाललेला उपक्रम व राष्ट्रीय चायना एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क सर्नेटची (Cernet) पुनरावृत्ती आहे. हे नेटवर्क जुलैमध्ये ॲक्टिव्ह झाले आणि सोमवारी अधिकृतपणे ते लाँच केले गेले. नेटवर्कने सर्व ऑपरेशनल चाचण्यांना मागे टाकले आणि उत्तम कामगिरी केली.

हेही वाचा…मोबाईल अन् डेस्कटॉपवर गुगल डॉक्समध्ये डबल स्पेस कसे द्याल? पाहा ‘ही’ सोपी पद्धत…

नेटवर्क खरेच वेगवान आहे का हे समजून घेत हुवाई टेक्नॉलॉजीचे (Huawei Technologies) उपाध्यक्ष वांग लेई (Wang Lei ) यांनी स्पष्ट केले की, हे वेगवान इंटरनेट फक्त एका सेकंदात १५० (150) हाय डेफिनिशन चित्रपटांचा डेटा ट्रान्सफर (transfer) करण्यास सक्षम आहे. दरम्यान, चायनीज ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंगमधील एफआयटीआय (FITI) प्रकल्पाचे नेते वू जियानपिंग (Wu Jianping )म्हणाले की, सुपरफास्ट लाइन ही फक्त एक यशस्वी ऑपरेशन नाही, तर चीनला अधिक वेगवान इंटरनेट तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानदेखील देते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंघुआ युनिव्हर्सिटीचे एक्सयू मिंगवेई (Xu Mingwei of Tsinghua University) यांनी वेगवान इंटरनेट बॅकबोनची सुपरफास्ट ट्रेन ट्रॅकशी तुलना करून स्पष्ट केले की, हे वेगवान इंटरनेट समान प्रमाणात डेटा वाहून नेण्यासाठी १० (10) नियमित ट्रॅक बदलते आणि परिणामी अधिक किफायतशीर व व्यवस्थापित प्रणाली बनते. तसेच या सिस्टीमचे सर्व सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर देशांतर्गत तयार केले गेले आहेत, असे सांगण्यात येत आहे.