नुकतीच एक अशी घटना घडली ज्यामुळे एका पित्याने आपल्या मुलाच्या काळजीपोटी चक्क रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांचीच मदत घेतली. त्याच झालं असं किशन राव यांचा मुलगा शांतनु पहिल्यांदाच एकटा ट्रेनने आपल्या गावी जाण्यासाठी निघाला होता. किशन राव, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा यासाठी खूपच उत्सुक आणि खुश होते. शांतनुने आपला प्रवास सुरु केल्यानंतर तब्बल ५ तासांनी किशन राव यांनी शंतनूला कॉल केला परंतु त्याचा फोन बंद लागला. यामुळे किशन राव खूपच घाबरले. ते शांतनुला सतत फोन करत होते पण काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला.

किशन राव यांनी लगेचच रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना टॅग करून एक ट्विट केले, जेणेकरून शांतनुच्या लोकेशनबाबत माहिती मिळेल. ट्विट केल्यानंतर जवळपास ३० मिनिटांनी राव यांना एक कॉल आला. हा कॉल शांतनुचा होता. शांतनुने आपल्या वडिलांना तो ठीक असल्याचे सांगितले. आपला मुलगा ठीक आहे हे ऐकून राव यांचा जीव भांड्यात पडला. एका रिपोर्टनुसार ही घटना १९ एप्रिलची आहे.

कुत्र्याला टेनिस खेळताना कधी पाहिलंय का? Viral Video पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित

किशन राव हे एका ऑटोमोबाईल कंपनीत जनरल मॅनेजर आहेत. त्यांनी सांगितले की शांतनु दहावीत शिकत असून त्याची परीक्षा संपल्यानंतर त्याला त्याच्या वडिलोपार्जित घरी कोट्टायम, केरळ येथे जायचे होते. राव यांनी सांगितले की शांतनु १९ एप्रिल रोजी मंगळुरु सेंट्रल स्टेशनवर पहाटे ५ वाजता परशुराम एक्स्प्रेसमध्ये चढला होता. त्याचा चुलत भाऊ, एर्नाकुलम आणि कोट्टायम दरम्यान असलेल्या पिरावोम रोड रेल्वे स्टेशनवर दुपारी २.३० च्या सुमारास शांतनुला घेणार होता.

Viral Photo : १० रुपयाच्या नोटेवर प्रेमीकेने प्रियकरासाठी लिहिला ‘हा’ संदेश; दोन प्रेमींना एकत्र आणण्यासाठी नेटकरी झाले एकजूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शांतनुचे वडील पुढे म्हणाले, ‘सकाळी १० च्या सुमारास मी त्याला फोन केला, मात्र त्याचा फोन बंद आहे हे समजल्यावर मला धक्काच बसला. मी आणखी काही वेळ शंतनूला फोन करत राहिलो, पण फोन बंद होता. मला टीटीई नंबरही मिळू शकला नाही, मग शेवटी १०.३४ वाजता मी रेल्वेमंत्र्यांना ट्विट केले. आणि मला तात्काळ मदत मिळाली.’