सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. त्यातल्या त्यात मजेशीर व्हिडीओंना नेटकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळते. बाइक आणि स्कूटी चालवण्याची प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते. पण मुलींची स्टाईल ही सगळ्यात भारी असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल, की लोकं मुलींच्या स्कूटी चालवण्यावरती अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण यामागील कारण देखील तशीच असतात. मुली गाडी चालवताना जराही चुकल्या तर सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातं. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक मुलगी बाइक सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक तरुणी बाइकवर बसून ती सुरू करण्यासाठी जोरात किक मारताना दिसत आहे. एकापाठोपाठ एक किक मारल्यानंतरही ती मुलगी बाइक सुरू करू शकत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सरतेशेवटी, मुलगी जोरात किक मारते तेव्हा बाइकची किक तुटते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
सोशल मीडियावर व्हिडीओला हजारो वापरकर्त्यांकडून लाईक्स मिळाले असून जवळपास लाखो व्ह्यूज मिळत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.