नवरात्रोत्सव संपून काही दिवस झाले तर अजूनही लोकांच्या मनातून गरबा-दांडीया जात नाहीये. आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे तरीहीअजूनही सोशल मीडियावर गरबा दांडियाचे व्हिडीओ ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर गरबा-दांडीया खेळतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील पण तुम्ही कधी मराठी गाण्यावर गरबा खेळताना कोणाला पाहिले आहे का? नसेल हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ एकदा नक्की पाहा. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी चंद्रा या गाण्यावर चक्क गरबा डान्स करताना दिसत आहे. तरुणीने अत्यंत अप्रतिम डान्स आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की, “चंद्रा हे मराठी लावणी गीत आहे ज्यावर अमृता खानविलकर या मराठी अभिनेत्रीने लावणी सादर केली होती. चंद्रा या चित्रपटातील हे लावणी गीत प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आले होते. या मराठी लावणीवर कोणी गरबा करु शकते याची कल्पनाही कोणी केली नसेल त्यामुळेच तरुणीचा चंद्रा गाण्यावरील गरबा डान्स पाहून लोक थक्क झाले आहेत.

हेही वाचा – कहर! बिस्किटमध्ये बटाट्याची भाजी भरून महिलेने तळले भजी; Viral Video पाहून भडकले नेटकरी

इंस्टाग्रामवर ambatkar_aarti या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीने साडी परिधान केलली दिसत आहे आणि ती नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या गरबा दांडिया उत्सवात सहभागी झालेली आहे. तरुणी अत्यंत उत्साहात चंद्रा गाण्यावर गरबा नृत्य सादर करताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘खलासी’ गाण्यावर तरुणीने केला जबरदस्त बेली डान्स; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी झाले फॅन

तरुणीचे डान्स करतानाचे हावभाव पाहून लोक थक्क झाले आहेत. त्यानंतर मराठी गीत केळीवाली या गाण्यावरही ही तरुणी उत्साहात नाचताना दिसत आहे. दरम्यान तरुणीचा डान्स आणि अदा पाहून लोक तिच्यावर फिदा झाले आहेत. या तरुणीसह इतरही काही जणी आहेत पण व्हिडीओमध्ये फक्त एकच तरुणी दिसते आहे.

हेही वाचा – ना कधी शाळेत गेली, ना कधी शिक्षण घेतले तरीही फाडफाड इंग्रजी बोलतेय ‘ही’ गावातील महिला, Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकांना व्हिडीओ प्रचंड आवडला असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, मराठी गाण्यावर गरबा आणि तोही इतका सुंदर डान्स…मस्तच.” आणखी एकाने प्रतिक्रिया दिली…”वाह, काय डान्स केला. अप्रतिम”