सोशल मीडियाचे अनेक फायदे आणि तोटेही आहेत. पण अनेकवेळा अशी दृश्ये इथे पाहायला मिळतात, ज्यावर सगळेच भारावून जातात. अशीच एक सुंदर घटना सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडीओमध्ये आफ्रिकन लोक बॉलिवूड गाण्यांचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनातून आनंद झाला पाहिजे. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी पुढे आहे आणि एक मुलगा तिच्या मागे उभा आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या बॉलीवूड चित्रपटातील ‘रातां लांबियां’ (Raataan Lambiyan) या गाण्यावर दोघेही वेगळ्या स्टाईलमध्ये परफॉर्म करत आहेत. शेरशाह चित्रपटातील हे गाणे भारतातही खूप पसंत केले गेले. पण आता आफ्रिकेतील लोकांनाही ते आवडू लागले आहे हे यातून दिसून येतं.

हा व्हिडीओ किली पॉलने (Kili paul) इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हृदय जिंकणाऱ्या कमेंट्सही केल्या आहेत.

( हे ही वाचा: दोन डोक्यांची पाल बघितली का? ऑस्ट्रेलियन प्राणीसंग्रहालयातील व्हिडीओ व्हायरल )

( हे ही वाचा: लज्जास्पद! ‘कंबरेचा आकार,बेडवरील कपडे…’ मुलाची मॅट्रिमोनिअल साइटवरची जाहिरात व्हायरल )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सची प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, संगीताची कोणतीही सीमा असू शकत नाही. त्याचवेळी आणखी एका यूजरने सांगितले की, संगीत कोणत्याही भाषेत असले तरी लोकांना ते आवडते. हे संगीताचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. याशिवाय अनेक यूजर्सनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे.