Viral Video: चहाला भारतीय संस्कृतीत एक विशेष स्थान आहे. कडक उन्ह असो, मुसळधार पाऊस असो किंवा मग हिवाळा वर्षभर आनंद देणारा हा चहा प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहिला आहे. बऱ्याचदा आपण चहाबरोबर बिस्कीट, ब्रेड, टोस्ट, पोळी खातोच. पण, चहाबरोबर बन मस्का खाण्याची मजा काही वेगळीच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता आपला लाडका बन मस्का सीमा ओलांडून लंडनच्या रस्त्यांवर पोहोचला आहे. जिथे अलीकडेच एका बेकहाऊसने त्यांच्या मेनूमध्ये बन मस्का-चहाचे प्रिय संयोजन जोडले आहे.

भारतीय बन-मस्का,चहाने ब्रिटीश कन्टेन्ट क्रिएटर लालीचे लक्ष वेधून घेतले आहे. कन्टेन्ट क्रिएटरने अलीकडेच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे ; ज्यामध्ये यूकेमध्ये एका बेकहाउसमध्ये बन-मस्का-चहा हे ऐकताच तिने आनंद व्यक्त केला आहे आणि धावत त्याचा आस्वाद घेण्यासाठी जाताना दिसली. त्यानंतर कन्टेन्ट क्रिएटरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालक बन मस्का-चहाची ओळख करून देताना दिसत आहे. ते सांगत आहेत की, हा चाय गाय बेकहाउसचा (Chai Guys Bakehouse) बन मस्का आहे. ज्यामध्ये एक ट्विट्स आहे. नक्की काय ट्विट आहे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…बुद्धिमान गजराज! झाडावरून फणस काढण्यासाठी हत्तीचा जुगाड; घराच्या छतावर टेकवले पाय अन्… VIDEO पाहून म्हणाल हुश्शार

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मालक सांगताना दिसत आहे की, बेकहाउसचे मालक गॅब्रिएल आणि अभिलाष यांनी मध, लोणीसह जपानी दुधाच्या पिठापासून बनवलेले बन मस्का सादर करून काहीतरी नवीन शोध लावले आहेत. म्हणजेच यांनी बनवलेला बन मस्कामध्ये जपानी दुधाचे पीठ आहे ज्यामध्ये मध, मऊ लोणी आहे. कन्टेन्ट क्रिएटर लाली अगदी भारतीयांप्रमाणे बेकहाउसमध्ये जाते चहामध्ये बन मस्का बुडवते आणि त्याचा आनंद घेताना दिसते आहे ; जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर आनंद येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @londonki_lali या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. चाय गाईज बेकहाऊस (Chai Guys Bakehouse) अनोख्या ट्विस्टसह भारताची बन मस्काची चव परदेशात घेऊन आले आहेत. पण, सध्या बन मस्का-चहा केवळ शनिवार आणि रविवारच्या दुपारच्या वेळेत उपलब्ध आहेत ; असे देखील त्यांनी सांगितले आहे. अनेक भारतीय नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्यांचे बन मस्का आणि चहवरील वरील प्रेम व्यक्त करताना दिसून आले आहेत. एकूणच भारतीयांचा बन मस्का आणि सातासमुद्रापार पोहचला आहे असे म्हणायला हरकत नाही आहे.