Viral Video: पृथ्वीवरील काही धोकादायक प्राण्यांबद्दल बोलायचे झाले तर त्यात सापांचा समावेश आहे. सापचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सापांशी संबंधित असलेल्यांना (Snake Video On Social Media) सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात. असाच एक केस व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक साप झाडावर लटकताना दिसत आहे. निसर्गातील विविध प्रकारच्या प्राण्यांची निर्मिती पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाचा साप झाडाच्या फांदीला लटकत आहे. त्याच वेळी, तो त्याचे शिकार पाहतो आणि त्याला गिळण्यास सुरुवात करतो. साप आपली संपूर्ण शिकार गिळताना दिसतो. या दरम्यान, त्याची त्वचा रबरासारखी पसरते.

(हे ही वाचा: Video: मोदींनी आठ वर्षात ‘इतक्या’ देशांना दिली भेट; जाणून घ्या खर्चाचा आकडा)

(हे ही वाचा: IPL 2022: एक लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी गायले “वंदे मातरम्”, अंगावर काटा आणणारा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर स्नेकमास्टरेक्सोटिक्स नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही तासातच या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाईक केले आहे. अनेक नेटीझन्स त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. हे अकाऊंट एरियाना नावाची ७ वर्षांची मुलगी चालवते, जी सापांशी संबंधित अनेक व्हिडीओ शेअर करत असते.