सध्या मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन स्कायडायव्हर्सनी आकाशात उडणाऱ्या विमानांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही आपापल्या विमानातून एकमेकांच्या विमानात चढण्यासाठी उडी घेतली.

हवेत उडणाऱ्या विमानाची अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात एक विमान कोसळले. ल्यूक एकिन्स आणि अँडी फॅरिंग्टन नावाचे दोन चुलत भाऊ आणि स्कायडायव्हर्स आपल्या विमानातून आपापल्या उंचीवर पोहोचले. यानंतर त्यांची विमान अदलाबदल करण्याची योजना होती, त्या दरम्यान त्यांचे विमान रिकामे राहील आणि दोघेही सुरक्षितपणे उतरतील. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्हीही पहा.

ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा…

लग्नात वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; प्रकरण पोहचलं मारामारीपर्यंत; पाहा Viral Video

फॅरिंग्टन ज्या विमानात जाणार होते ते विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि वेगाने खाली पडू लागले. यामुळे फॅरिंग्टनला त्यात चढता आले नाही आणि त्याला त्याचा स्टंट पूर्ण करता आला नाही. त्याला पॅराशूटच्या मदतीने उतरवावे लागले. तथापि, एकिन्सने त्याचा स्टंट पूर्ण केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फॅरिंग्टनच्या मते, सर्व काही ठीक चालले होते परंतु त्याची योजना यशस्वी झाली नाही. दोघांनाही सुरक्षित ठेवणे हा या योजनेचा सर्वात महत्त्वाचा भाग होता. ‘यूएसए टुडे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एकिन्स म्हणाले की, आम्ही परत जाऊन यावर काम करू. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ८६ हजार व्हूज मिळाले आहेत.