Fridge Viral Video : हल्ली प्रत्येकाच्या घरी फ्रिज असतो. या फ्रिजमध्ये आपण भाजीपाला, दूध, कडधान्यापासून ते मसाल्यांपर्यंत अनेक गोष्टी साठवून ठेवतो, जेणेकरून खूप दिवस त्या चांगल्या प्रकारे वापरता येतील. पण त्या वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्या आणि झालं, असं होत नाही. वेळोवेळी प्रत्येक वस्तूच्या मुदतीची तारीख तपासून, मगच त्या वापरल्या पाहिजेत. तसेच ट्रेमधील हिरव्या भाज्या ठरावीक दिवसांत संपल्या पाहिजेत; अन्यथा त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे दर्शविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एका फ्रिजमधील असे दृश्य दिसतेय की, पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
तुमच्या घरातील फ्रिज उघडताच तुम्हाला काय दिसते तर, पाण्याच्या बाटल्या, हिरव्या भाज्या, मिठाई, थंड पेये, दही, मसाले इत्यादी. पण, तुम्ही कधी फ्रिजमध्ये कधी रोपटं पाहिलं आहे का? तुम्हाला हा प्रश्न विचित्र वाटण्याची शक्यता असली तरी व्हायरल व्हिडीओमध्ये हेच दिसतंय. व्हिडीओत पाहू शकता की, एका फ्रिजमध्ये कोणती तरी हिरवी भाजी की धान्य, असं काहीतरी ठेवलं आहे, ज्याला कोणीच बरेच दिवस स्पर्शही केलेला नाही. त्यामुळे त्यातून अंकुर फुटला आणि नंतर हळूहळू रोप बाहेर आलं. आश्चर्याची बाब म्हणजे हे रोप इतकं मोठं झालं की, पाहून तुम्हालाही धक्का बसेल. अगदी फ्रिजमधील दोन कप्पे पार करून, ते रोप वाढून फ्रिजरपर्यंत जाऊन टेकलं. फ्रिजमध्ये अशा प्रकारे उगवलेल्या रोपाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ star_florals नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय की, हा एक पर्यावरणपूरक फ्रिज आहे. दुसऱ्याने लिहिले की, याला इनडोअर कल्टिवेशन म्हणतात. तिसऱ्याने लिहिले की, कधी कधी फ्रिजदेखील उघडला पाहिजे. चौथ्याने लिहिलेय की, हा एक फ्रिज प्लांट आहे. त्याच वेळी अनेकांनी व्हिडीओवर हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.