कधी कधी लग्नात अशा काही घटना घडतात, ज्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. लग्नामध्ये नवरा आणि नववधू खूप खुश असतात. आपण त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहू शकतो. मात्र काहीवेळा लहान-लहान गोष्टींवरून वाद होतात आणि प्रकरण गंभीर होते. भारतात लग्नाचा हंगाम सुरू झाला असून आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ येऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडीओमुळे सध्या खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये, स्टेजवर उभ्या असलेल्या वधू-वरामध्ये किरकोळ कारणावरून भांडण होते आणि ते एकमेकांना कानाखाली मारू लागतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. हार घालताना, वधू वराला मिठाई खाऊ घालते, परंतु वराचे लक्ष कॅमेराकडे असते. वधू काही सेकंद थांबते, परंतु जेव्हा वर तिच्याकडे पाहत नाही तेव्हा वधूला राग येतो.

VIDEO: RRR चित्रपटाची क्रेझ; मुलांनी चित्रपटगृहातच केली नाचायला सुरुवात; जबरदस्त डान्स पाहून नेटकरीही झाले खुश

दोन मुलांनी मिळून सायकलसोबत केली अनोखी गोष्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केला मन जिंकणारा व्हिडीओ

त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या प्रकारामुळे चिडलेल्या वराने वधूला कानाखाली मारली, प्रत्युत्तरात वधूनेही वराला कानाखाली मारली. यानंतर वधू-वर एकमेकांना एका मागोमाग एक कानाखाली मारू लागतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असेही म्हणू लागले आहेत की वधू-वराच्या भांडणाचा हा व्हिडीओ खोटा असून त्यात त्यांचा अभिनय स्पष्ट दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रकरण कुठले आहे किंवा या व्हिडीओमागील सत्य काय आहे, याची सध्या तरी पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत. इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड करताच लोकांना तो खूप आवडला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आजच मारणार का?’. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.