जपान हा देश आपल्या विविधता, विशेषतः आपल्या खाण्यापिण्याच्या संस्कृतीसाठी जगभरात लोकप्रिय आहे. जपानी लोक त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, विविध फळे आणि सीफूडला प्राधान्य देतात. या फळांपैकी एक विशिष्ट फळ म्हणजे ‘रुबी रोमन द्राक्षे’. द्राक्षांची ही प्रजात फक्त जपानमध्येच पाहायला मिळते. तसेच, हे फळ इतके महाग आहे की ही द्राक्ष विकत घेणे सगळ्यांच्याच आवाक्यात नाही.

रुबी रोमन द्राक्षे ही उत्कृष्ट प्रजातीची द्राक्षे म्हणून ओळखली जातात. ही द्राक्षे सामान्य द्राक्षांपेक्षा ३ ते ४ पट मोठी असतात. यातील एका द्राक्षाचे वजन जवळपास २० ग्राम असते. परंतु, प्रीमिअम गुणवत्तेच्या एका द्राक्षाचे वजन ३० ग्रामपर्यंत असते. अहवालानुसार, द्राक्षांची ही प्रजात जपानच्या चुबू राज्याच्या इशिकावा जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. इथल्या मातीत आणि वातावरणातच ते तयार करता येतं. या पिकासाठी खास हरितगृह बनवले जाते आणि विशेष तापमान राखावे लागते. हरितगृहाचे तापमान ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास संपूर्ण पिकाचे नुकसान होण्याचा धोका असतो.

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

‘बिझनेस इनसाइडर’च्या रिपोर्टनुसार, रुबी रोमन द्राक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा गडद रंग आणि गोड चव. जगात द्राक्षांची अशी कोणतीही प्रजात नाही जी इतकी लाल आणि आकाराने मोठी असेल. पीक तयार झाल्यानंतर, आकार, रंग, गोडवा अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर त्याची चाचणी केली जाते.

रुबी रोमन द्राक्षांची सर्व पॅरामीटर्सवर चाचणी केल्यानंतर त्याचा दर निश्चित केला जातो. सुपीरियर आणि स्पेशल सुपीरियर अशा दोन श्रेणींमध्ये प्रामुख्याने दर निश्चित केले जातात. सुपीरियर श्रेणीतील रुबी रोमन द्राक्षांच्या गुच्छाची किंमत ९० आणि १४० डॉलर दरम्यान असू शकते. त्याचप्रमाणे, स्पेशल सुपीरियरची किंमत १८० ते ४५० डॉलर्सपर्यंत असू शकते.

जाणून घ्या : होळी सणामध्ये रंगांचा समावेश होण्यामागची रंजक गोष्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दोन श्रेणींव्यतिरिक्त, तिसरी श्रेणी देखील आहे, ज्याला ‘प्रीमियम’ म्हणतात. सुपीरियर आणि स्पेशल सुपीरियर श्रेणीमध्ये अशी द्राक्षे ठेवली जातात ज्यांचे वजन २० ग्रॅमपर्यंत असते, परंतु प्रीमियम श्रेणीमध्ये ३० ग्रॅम असलेल्या द्राक्षांना स्थान मिळते. दरवर्षी या श्रेणीमध्ये केवळ एक किंवा दोन घड आपली जागा निश्चित करतात. प्रीमियम श्रेणीतील एका घडाची किंमत एक हजार डॉलरपेक्षा जास्त आहे. २०२१ मध्ये, केवळ दोन घडांनी प्रीमियम श्रेणीचे निकष पूर्ण केले. २०२० आणि २०१९ मध्ये या श्रेणीत स्थान मिळवेल असा एकही घड तयार झाला नाही.

रुबी रोमन द्राक्षेचे उत्पन्न खूपच कमी आहे, परंतु त्याची मागणी अधिक आहे. अशा स्थितीत अनेक वेळा बोली लावली जाते. २०२० मध्ये, लिलावादरम्यान, रुबी रोमन द्राक्षांचा एक घड बारा हजार हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे साडे आठ लाख रुपयांना विकला गेला.