चोर सुद्धा तत्ववादी असतात…असं जर आम्ही म्हटलं तरी तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ठाण्यातल्या एका मंदिरात ही विचित्र घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मंदिरात चोरी करण्यासाठी आलेला चोर सुरूवातीला देवाच्या चरणांना स्पर्श करत आशिर्वाद घेत आणि मग नंतर देवासमोरची दानपेटीच चोरून नेतो. आगळ्या वेगळ्या चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना खोपट बस डेपोजवळ असलेल्या कबीरवाडी हनुमान मंदिरात घडलीय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हनुमानभक्त चोराला अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मंदिरात चोरी करण्यापूर्वी हा चोर मोबाईलवर आधी फोटो काढत असल्याचं दिसत आहे. या दरम्यान तो पुन्हा पुन्हा बाहेर बघतोय. यानंतर तो हनुमानच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतो. त्यानंतर मूर्तीसमोर ठेवलेली दानपेटीच घेऊन पळून जातो. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली असता त्यांना विशेष काही वाटलं नाही. त्यानंतर मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासले असता त्यात आरोपी स्पष्ट दिसून आला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : १४० रुपये देऊन फूड ब्लॉगरने चाखली या विचित्र पदार्थाची चव!, चेहऱ्यावरचे हावभाव एकदा पाहाच…

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात वहिनीसोबत मस्करी करणं दीराला महागात पडलं…नवरीने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक

नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आजूबाजूच्या लोकांची तातडीने चौकशी करण्यात आली. मंदिरात कोणी राहत नाही हे फक्त इथल्या स्थानिक रहिवासीयांनाच माहीती आहे. हे गृहीत धरूनच पोलिसांनी तपास सुरू ठेवला. पोलिसांच्या पथकाने चोराचा फोटो स्थानिक लोकांना दाखवला, यावरून संशयितांच्या ओळखीचे अनेक संकेत मिळाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी राबोडी इथे राहणाऱ्या केजस म्हसदे (वय 18) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्या मित्राचाही उल्लेख केला, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोपट बस डेपोजवळील कबीरवाडी हनुमान मंदिराचे पुजारी महंत महावीरदास यांनी सांगितले की, ते मंदिरात पोहोचले असता दानपेटी गायब होती. यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. दानपेटीत हजार रुपये असल्याचे पुजाऱ्याने सांगितले.