Viral video: आजकाल अनेक चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे अधिक होत चालली आहेत. सोशल मीडियावरही याचे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. चोर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरुन चोरीच्या संधी शोधून काढतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये चोर महिलेच्या पर्समधून मोबाईल चोरी करतो, मात्र त्याच नशीब इतक खराब असतं की लोक त्याला पकडतात. आता पुढे काय झालं हे तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा. या चोराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चोर आजकाल असे सुसाट चोऱ्या करतात की आपण कधी रिकामे होतो कळतच नाही. बस, ट्रेन अगदी रस्त्यानं चालतानाही हे चोर कधी हात साफ करुन जातील याचा नेम नाही. असाच एक तरुण चोरी करण्यासाठी आला खरा, त्याने चोरीही केली मात्र नेमका तो सापडला. यानंतर त्याची लोकांनी अशी जी धुलाई केली की, तो या जन्मात पुन्हा कधीही चोरी करणार नाही. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, तरुणाला काही लोकांनी पकडले आहे, त्याला ते चोरी केलेला मोबाईल दे असं सांगत आहेत, मात्र तो माझ्याकडे नाहीये मोबाईल असं उत्तर देतो. मग लोक त्याला असे मारतात की त्याचा त्यात जीवही गेला असता.

व्हिडीओमध्ये आवाज येत आहे की, लोकांच्या म्हणण्यानुसार त्यानं नशा केली आहे, तो तरुण नशेत आहे. काहीवेळाने जमलेले लोक पोलिसांना बोलावतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तोच रुबाब तोच दरारा! बाळासाहेबांचा ढाण्या वाघ; साक्षात आनंद दिघे टेंभीनाक्यावर येतात तेव्हा, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून संताप येतो. हा व्हिडीओ @Ghar Ke Kalesh या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स, व्ह्युज मिळत आहेत.