Viral video: लूटमार, चोरी अशा गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडिया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असू देत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरी करताना चोरटे अगदी नियोजन करून चोरी करतात, असे म्हटले जाते. कारण- चोरी करताना तो पकडला जाण्याची त्याला भीती असते. तसे झाल्यास आधी सार्वजनिक ठिकाणी असलेले लोक चोराला पकडून मारतात आणि मग पोलिसांच्या ताब्यात देतात. चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर का तुम्ही चोरी करताना पकडला गेलात, तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते.

चोराला घडली जन्माची अद्दल

चोरीची मोठी शिक्षाही होऊ शकते हे माहीत असूनही काही मंडळी झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडतात. अशाच एका गुन्हेगाराचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये चोराचा डाव थोडक्यात हुकला आणि चोराला जन्माची अद्दल घडली आहे. पुढे या चोराचं काय झालं ते तुम्हीच पाहा. या चोरांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा ‘या’ चोराला तुम्ही काय म्हणाल, हुशार का मुर्ख?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन चोर घराच्या आवारात चोरी करण्यासाठी शिरतात. यावेळी दोघं घराच्या बाहेर उभी असलेली स्कूटी चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अशातच त्यांनी त्यांची स्कूटी गेटच्या बाहेर उभी केल्याचं दिसत आहे. तेवढ्यात घराचा मालक बाहेर आला. त्याला पाहून चोर घाबरले आणि त्यांची स्कूटी तिथंच सोडून पळून जाऊ लागले. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी आपली स्कूटीही तिथेच सोडून पळाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking video: रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; ती बुडत होती अन् आई-मावशी रील बनवत राहिल्या…

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @HasnaZaruriHai नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “स्कूटी चोरायला आले होते; पण स्वतःचीसुद्धा सोडून पळाले.” हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो युझर्सनी पाहिला असून अनेकांनी तो लाइक आणि शेअर देखील केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. त्यासोबतच अनेकांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलेय की, “त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात द्या, तक्रार करा.” तर आणखी एकानं म्हटलंय की, “एकदम बरोबर केलं.”