असं म्हटलं जातं की माणूस हा शरिरानं वृद्ध झाला तरी चालेल पण मनानं वृद्ध होऊ नये. कारण जर तुमचं मन तरुण असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याची मजा घेऊ शकता. आपण अनेकदा एकलं आहे वय तर फक्त आकडा आहे. हेच एका ७ वर्षांच्या आजीनं सिद्ध करुन दाखवलं आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी आजीबाईंनी दाखवलेल्या धाडसाचं उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही कौतुक केलं आहे. या आजीबाईंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. आजीचा उत्साह आणि धाडस पाहून तरुणांनाही घाम फुटेल. सातत्याने बरीच वर्ष नोकरी करून किंवा वयाची ५० वर्षे ओलांडल्यानंतर अनेकजण कामावरून निवृत्ती घेतात आणि आरामाचे जीवन जगतात. पण, काही जण असे असतात जे वयाची कितीही वर्ष ओलांडून गेली तरीही काही ना काही अनोखे करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. अशाच या आज्जीने या वयात चक्क बिनधास्तपणे पॅराग्लायडींग करुन दाखविले आहे.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत “तुम्ही कोणत्याही वयात उड्डाण घेऊ शकता, आज या माझ्या हिरो आहेत. असं कॅप्शन लिहलं आहे.” या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोकांच्या मदतीने आजीबाई पॅराग्लायडरच्या आत बसतात, त्यानंतर त्यांनी गॉगल आणि हेल्मेट घातले. त्यानंतर मोटर सुरु करुन हे पॅराग्लायडर आजीला घेऊन हवेत उडाले. हा व्हिडीओ पाहून लोक आजीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> राणू मंडल यांचा आणखी एक VIDEO व्हायरल; पुन्हा उद्धट वागणं भोवलं, नेटकरी म्हणतात “म्हणून आज अशी वेळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज गेले आहेत.